(म्‍हणे), ‘पुणे येथे सहस्रो महिला अथर्वशीर्ष म्‍हणायला रस्‍त्‍यावर दिसल्‍या; पण फुलेवाड्यात कुणी गेले नाही !’ – छगन भुजबळ, मंत्री Ganeshotsav

(Ganeshotsav, Ganesh Chaturthi, Ganapati) 

दगडूशेठ बाप्पांसमोर महिलांचं सामूहिक अथर्वशीर्ष पठण

नाशिक – महाराष्‍ट्र सरकारने अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कायदा केला; पण काही उपयोग नाही. (केवळ हिंदु धर्मातील रूढी आणि परंपरा नष्‍ट करण्‍यासाठी सिद्ध केलेल्‍या अंनिसच्‍या कायद्याचा कधी उपयोग होऊ शकतो का ? – संपादक) आजही अधिकाधिक लोक अंधश्रद्धेच्‍या आहारी जात आहोत. त्‍या पू. बागेश्‍वर महाराजाकडे (पंडित धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री यांच्‍याकडे) ५ लाख लोक जातात. (यावरूनच हिंदूंची श्रद्धा किती प्रबळ आहे आणि श्रद्धांवर घाला घालणार्‍या कायद्याचा काही उपयोग नाही, हे लक्षात येते ! – संपादक)

(सौजन्य : Zee 24 Taas) 

अलीकडेच पुणे येथे सहस्रो महिला अथर्वशीर्ष म्‍हणायला रस्‍त्‍यावर दिसल्‍या; पण रस्‍त्‍याच्‍या पलीकडे फुलेवाडा, फुलेंची शाळा आहे, तिथे नतमस्‍तक व्‍हायला कुणी गेले नाही, असे वक्‍तव्‍य अन्‍न नागरी आणि पुरवठा मंत्री अन् राष्‍ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते छगन भुजबळ यांनी व्‍यक्‍त केली. (यासाठी भुजबळ यांनीच आत्‍मपरीक्षण केले पाहिजे ! पंडित धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री यांच्‍याकडे ५ लाख लोक जातात, तर ते का जातात ? हे लक्षात घेतले पाहिजे. अथर्वशीर्ष म्‍हणण्‍याचे लाभ पाश्‍चात्त्य सांगतील, तेव्‍हा तरी भुजबळांच्‍या लक्षात येतील का ?- संपादक)

अन्‍न नागरी आणि पुरवठा मंत्री अन् राष्‍ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते छगन भुजबळ

नाशिक शहरात सत्‍यशोधक समाज स्‍थापनेच्‍या शतकोत्तर सुवर्ण वर्षपूर्ती आणि सत्‍यशोधक चळवळीचे संशोधक प्रा. हरी नरके यांच्‍या स्‍मृतीप्रित्‍यर्थ सत्‍यशोधक समाजाचे ४१ वे महाराष्‍ट्र राज्‍य अधिवेशन जेजुरकर लॉन्‍स येथे पार पडले. या अधिवेशनाच्‍या समारोप कार्यक्रमाच्‍या वेळी ते बोलत होते.

संपादकीय भूमिका

  • मोठ्या संख्‍येने हिंदु महिला स्‍तोत्र म्‍हणतात, यामुळे भुजबळ यांना का खटकते ?
  • गणेशोत्‍सवात अथर्वशीर्ष म्‍हणणे, हे सयुक्‍तिक आहे; परंतु या काळात फुलेवाड्यात जाण्‍याचा काय संबंध ?
  • पुणेकरांच्‍या मनात फुलेवाड्याविषयी कोणताही द्वेष नाही; मात्र अशी वक्‍तव्‍ये मंत्र्यांकडून जातीद्वेषापोटीच केली जात आहेत, असे कुणाला वाटले, तर चूक ते काय ?