‘वर्ल्ड हिंदु काऊंसिल ऑफ अमेरिका’च्या ‘अमेरिकन हिंदू अगेन्स्ट डिफेमेशन’ या हिंदुत्वनिष्ठ संघटनेची संकल्पना !
(एआय म्हणजे कृत्रिम बुद्धीमत्तेचे तंत्रज्ञान)
स्प्रिंगफील्ड (अमेरिका) – ‘अमेरिकन हिंदू अगेन्स्ट डिफेमेशन’ (ए.एच्.ए.डी. – हिंदु अनादराच्या विरुद्ध अमेरिकी हिंदू) या हिंदुत्वनिष्ठ संघटनेने हिंदुद्वेष ओळखण्यासाठी आणि त्याचा प्रतिकार करण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेचा आधार घेणार्या संकेतस्थळाचा नुकताच शुभारंभ केला. ‘Tattwa.ai’ ही या संकेतस्थळाची मार्गिका असून शैक्षणिक, पत्रकारिता, तसेच कायदा या क्षेत्रांतील हिंदुत्वनिष्ठांना हिंदुविरोधी घटकांना प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी याचा उपयोग होईल, अशी माहिती ‘ए.एच्.ए.डी’चे समन्वयक आणि ‘वर्ल्ड हिंदु काऊंसिल ऑफ अमेरिका’ या संघटनेचे अध्यक्ष अजय शहा यांनी दिली.
‘ए.एच्.ए.डी’ या संघटनेची अमेरिकेत वर्ष १९९७ मध्ये स्थापना झाली. हिंदु धर्म आणि धर्मग्रंथ आदींच्या अपकीर्तीविरुद्ध लढणारी अमेरिकेतील ही पहिली संघटना आहे.
‘ए.एच्.ए.डी’ने पुढील ‘ए.आय.’ साधनांची घोषणा केली :
१. हिंदूहेट डिटेक्टर (हिंदुद्वेष ओळखणारा) : हे नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचे साधन विविध दृष्टीकोनांतून पूर्वग्रहदूषित लिखाणाचे विश्लेषण करण्यास सक्षम आहे. तब्बल २ सहस्र नियमांचा वापर करून इंटरनेटवर प्रकाशित झालेल्या हिंदुद्वेष्ट्या साहित्याचे ते वस्तुनिष्ठ मूल्यांकन करणार आहे.
२. शिक्षणतज्ञ, पत्रकार आणि स्तंभलेखक यांची माहिती : हिंदु धर्म, हिंदुत्व आणि संबंधित सूत्रे यांवर भाष्य करणारे शिक्षणतज्ञ, पत्रकार अन् स्तंभलेखक यांची विस्तारपूर्वक माहिती पुरवली जाणार आहे.
३. सर्वसमावेशक राजकीय दृष्टीकोन : हिंदु दृष्टीकोनातून अमेरिकेतील राजकीय उमेदवारांचे कार्य, त्यांना मिळणारा निधी आणि त्यांनी केलेली सार्वजनिक विधाने यांविषयी अंतर्दृष्टी प्रदान केली जाईल.
४. ‘एक्स’वरील विश्लेषक : हिंदुद्वेषाचे नमुने आणि चुकीची माहिती यांसाठी ‘एक्स’सारख्या सामाजिक माध्यमांतील सामग्रीचे विश्लेषण करण्यासाठी एक प्रगत साधन लवकरच उपलब्ध करण्यात येणार आहे.
संपादकीय भूमिकाअत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मुसलमान, ख्रिस्ती, साम्यवादी आदी हिंदु धर्माच्या शत्रूंशी दोन हात करण्यासाठी ‘अमेरिकन हिंदू अगेन्स्ट डिफेमेशन’ने उचललेले हे पाऊल अनुकरणीय आणि स्वागतार्ह आहे. या निमित्ताने त्यांचे अभिनंदन ! |