जळगाव येथे इन्‍स्‍टाग्रामवरून आक्षेपार्ह माहिती प्रसारित केल्‍याने एकावर गुन्‍हा नोंद !

जळगाव – राजकीय पदाधिकार्‍याविषयी सामाजिक माध्‍यमांतील इन्‍स्‍टाग्रामवर आक्षेपार्ह माहिती पोस्‍ट केल्‍याप्रकरणी येथील समर्थ शिकवणी वर्गाचे संचालक दीपक पाटील (वय २५ वर्षे) यांच्‍याविरुद्ध सावदा पोलीस ठाण्‍यात अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. नाना संन्‍यास यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. संशयित पाटील यांनी सामाजिक माध्‍यमावर ही आक्षेपार्ह पोस्‍ट प्रसारित केल्‍यानंतर २५ जूनला रात्री ८ वाजता शहरातील काही लोकांनी थेट पोलीस ठाण्‍यावर मोर्चा काढून संबंधितांवर गुन्‍हा नोंद करण्‍याची मागणी केली होती. त्‍या वेळी ठिय्‍या आंदोलनही करण्‍यात आले होते. यानंतर पोलिसांनी वरील कारवाई केली.