सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवापूर्वी आणि ब्रह्मोत्‍सवाच्‍या दिवशी साधिकेला आलेल्‍या अनुभूती !

सहसाधिकेशी बोलतांना परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचा उल्लेख ‘पूर्ण पुरुषोत्तम’, असा करणे आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनीही ‘गुरुदेव ‘पूर्ण पुरुषोत्तम’ आहेत’, असे सांगणे

सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्‍या हातातून चैतन्‍य प्रक्षेपित होत असल्‍याची आलेली अनुभूती

‘२२.४.२०२२ या दिवशी रात्री ८.३० वाजता रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाच्‍या तिसर्‍या माळ्‍याच्‍या आगाशीतून सद़्‍गुरु डॉ. मुकल गाडगीळ साधकांना प्रयोग करून दाखवत होते. त्‍यांनी अंधारात समोरच्‍या डोंगराच्‍या दिशेने हात फिरवला. तेव्‍हा ‘त्‍यांच्‍या हातातून परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याप्रमाणेच चैतन्‍य प्रक्षेपित होत आहे’, असे मला दिसले.