दुधाचा दर निश्‍चित करण्‍यासाठी सरकारकडून समिती गठीत !

दुधाचे उत्‍पादन अल्‍प असतांना दुधाला चांगला दर मिळतो; मात्र दुधाचे उत्‍पादन अधिक असते, तेव्‍हा खासगी आणि सहकारी दूध संघाकडून दूध उत्‍पादनांना अल्‍प भाव दिला जातो.

महिलांच्‍या सुरक्षिततेसाठी पुणे शहरात रात्री पोलिसांची गस्‍त वाढवली !

आयटी कंपन्‍यांसह रात्री घरी परतणार्‍या नोकरदार महिलांच्‍या सुरक्षिततेसाठी शहरातील आयटी कंपन्‍यांचा परिसर, बसस्‍थानक आणि प्रमुख चौकांमध्‍ये २३ जूनपासून विशेष सुरक्षा अभियान चालू केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्‍या दीक्षांत समारंभात गदारोळ !

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठामध्‍ये २७ जून या दिवशी आयोजित केलेल्‍या ६३ व्‍या दीक्षांत समारंभात मंचावर बोलावून पदवी प्रमाणपत्र दिले नसल्‍याचे कारण पुढे करत पी.एच्.डी. संशोधक विद्यार्थ्‍यांनी गदारोळ घातला.

हिंदु शिक्षिकांनी २ मुसलमान विद्यार्थिनींचा हिजाब उतरवण्याचा प्रयत्न केला असता संघर्ष !

शाळांमध्ये भगवद्गीता शिकवण्याच्या विविध सरकारांच्या प्रयत्नांवर शिक्षणाचे भगवेकरण होत असल्याचा आरोप करणारे आता अशा घटनांमधून शिक्षणाचे इस्लामीकरण होत आहे, असे का म्हणत नाहीत ?

वर्ष २०१४ मध्ये रशियाने नियंत्रणात घेतलेल्या युक्रेनच्या गावावर युक्रेनकडून  नियंत्रण मिळवण्यास प्रारंभ !

रशियाने फेब्रुवारी २०२२ मध्ये जेव्हा युक्रेनवर आक्रमण केले, त्यानंतर युक्रेन वर्ष २०१४ मध्ये रशियाशी झालेल्या युद्धाच्या वेळी रशियाने नियंत्रणात मिळवलेली युक्रेनी क्षेत्रे प्रथमच परत मिळवू लागला आहे, असे म्हटले जात आहे.

इटलीमध्ये सार्वजनिक ठिकाणी नमाजपठणावर बंदी घालणारा कायदा होणार !

इटली असा कायदा करण्याचा प्रयत्न करू शकते, तर भारतातील १०० कोटीहून अधिक जनतेला सार्वजनिक ठिकाणी होणार्‍या नमाजपठणाचा त्रास होत असतांना येथे असा कायदा का करता येत नाही ?

भारतीय ‘युनीकॉर्न’ आस्थापनांच्या संख्येत कमालीची घट !

चीनमध्ये १ सहस्त्र युनीकॉर्न आस्थापने असून एका अनुमानानुसार भारतात पुढील ५ वर्षांत २०० आस्थापने हा दर्जा प्राप्त करतील.

एका मुसलमानासह चौघांना अटक : ८ ते १० आक्रमणकर्त्यांवर गुन्हे नोंद

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्धा जिल्हा संघचालकांना मारहाण केल्याचे प्रकरण

अपघातात मृत्यू झालेल्या हिंदु तरुणाचा मृतदेह कालव्यात फेकणार्‍या दोघा धर्मांध मुसलमानांना अटक

पोलिसांच्या चौकशीत महंमद दिलखुश याने सांगितले की, त्यांच्याकडे चारचाकी चालवण्याची अनुज्ञप्ती (परवाना) नव्हती. ते गाडीतून रोहना येथे जात असतांना त्यांनी मनोज कुमार याला धडक दिली.

कन्हैयालाल यांच्या हत्येला एक वर्ष उलटल्यानंतरही कुटुंबियांवरील तणाव कायम !

एक वर्षानंतरही अस्थींचे केले नाही विसर्जन !
आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत चपला न घालण्याचा मुलाचा पण !
कुटुंबियांना आजही आहे पोलीस संरक्षण !