मंचर – आंबेगाव तालुका येथील सकल हिंदु समाजाच्या वतीने २४ जून या दिवशी असलेल्या मंचर शहर बंदला व्यवसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून काढण्यात आलेल्या मोर्च्यात शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार महेश लांडगे, समस्त हिंदु आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे, भाजप किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष, तालुकाध्यक्ष आदी मान्यवर सहभागी झाले होते.
या वेळी पोलिसांचा बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात होता. छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या जाहीर सभेत शिवव्याख्याते नीलेश भिसे यांनी हिंदु धर्माची महानता, धर्मांतराची कारणे, गोतस्करी, गोहत्या, गोमांस विक्री यांवर भाष्य केले.