‘एम्.आय.टी. स्कूल ऑफ गव्हर्नमेंट’च्या वतीने १५ ते १७ जून मुंबईत ‘राष्ट्रीय विधायक संमेलन भारत’चे आयोजन !

देशभरातील २ सहस्र ५०० पेक्षा अधिक आमदार सहभागी होणार !

देहली विश्‍वविद्यालयाच्या अभ्यासक्रमात ‘सावरकर यांचे योगदान आणि दर्शन’ हा विषय समाविष्ट

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर देशासाठी सर्वस्वाचा त्याग करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार एका विश्‍वविद्यालयाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट होणे, हे सर्वपक्षीय राजकारण्यांसाठी लज्जास्पद !

(म्हणे) ‘हिंदु धर्म, मंदिरे आणि देव ही भाजपची वैयक्तिक संपत्ती नाही !’ – डी.के. शिवकुमार

काँग्रेसवाल्यांनी कितीही ‘ते हिंदुविरोधी नाहीत’, असे दाखवण्याचा प्रयत्न केला, तरी हिंदू त्यांचे खरे स्वरूप ओळखून आहेत !

‘हलाल जिहाद’, ‘लव्ह जिहाद’ यांच्या विरोधात जागृती करण्याचा, तसेच राष्ट्र आणि धर्म कार्यात सहभागी होण्याचा निर्धार !

या प्रबोधनामुळे व्यापारी-उद्योजक यांनी ‘हलाल शिक्का’ असलेली उत्पादने विक्रीस न ठेवण्याचा निश्चय केला. ‘हलाल’ संदर्भात व्यापक जनजागृती करू, तसेच प्रत्येकानेच राष्ट्र आणि धर्म कार्यात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला.

(म्हणे) ‘इंदिरा गांधी यांच्या हत्येचा देखावा प्रदर्शित करणे हा कॅनडात गुन्हा नाही !’ – कॅनडातील ब्रॅम्पटन शहराचे महापौर

कॅनडा म्हणजे खलिस्तान्यांचे माहेरघर झाले आहे. तेथील केवळ सरकारच नव्हे, तर अनेक राजकारणी खलिस्तान्यांचे समर्थन करत आहेत.

झारखंडमध्ये लव्ह जिहादला बळी पडलेल्या अल्पवयीन हिंदु मुलीची आत्महत्या

झारखंडमध्ये हिंदुद्वेषी झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे सरकार असल्यामुळे पीडितेला न्याय मिळण्याविषयी हिंदू साशंक आहेत !

अलंकापुरीत जमला वैष्णवांचा मेळा; माऊलींच्या पालखी सोहळ्याचे आज होणार पंढरपूरकडे प्रस्थान !

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ११ जून या दिवशी सायंकाळी ४ ते ६ च्या दरम्यान आळंदीतील देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. पालखी प्रस्थान सोहळा ‘याची देही याची डोळा’ अनुभवण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यांतून छोट्या-मोठ्या दिंड्या अलंकापुरीत आल्या आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या १२१ शाळा शिक्षकांविना !

महाराष्ट्रात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत असतांना शिक्षकांची पदे रिक्त ठेवून विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी करणारे प्रशासन काय कामाचे ?

गोवा : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हणजुणे पंचायतीकडून १७५ अनधिकृत बांधकामांना नोटीस

न्यायालयाने आदेश दिल्यानंतर नोटीस पाठवणारी हणजुणे पंचायत किनारा नियंत्रण क्षेत्रात १७५ बांधकामे होत असतांना काय करत होती ? अनधिकृत बांधकामे करणार्‍यांशी पंचायतीचे साटेलोटे आहे का ? कि पंचायत निष्क्रीय आहे ?

गोव्यात पुढील ४८ घंट्यांत मोसमी पावसाच्या आगमनासाठी हवामान अनुकूल

गोवा आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने जनतेला न घाबरण्याचे, होड्यांमधून किनारी भागात न जाण्याचे अन् सर्व सागरी क्रीडा बंद करण्याचे, तसेच ०८३२२४१९५५०, ०८३२२२२५३८३, ०८३२२७९४१०० या आपत्कालीन क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.