शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकार्यांची भेट घेणार
कणकवली – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२१ शाळांमध्ये एकही शिक्षक नसल्याने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिक्षक उपलब्ध नसल्यास या शैक्षणिक वर्षापासून शाळा बंद होणार आहेत. याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक १२ जून या दिवशी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांची भेट घेणार आहेत.
या वेळी जिल्ह्यातील शिक्षक-पालक संघाच्या पदाधिकार्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन पक्षाचे जिल्हाप्रमुख सतीश सावंत आणि संजय पडते यांनी केले आहे.
संपादकीय भूमिकामहाराष्ट्रात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत असतांना शिक्षकांची पदे रिक्त ठेवून विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी करणारे प्रशासन काय कामाचे ? |