J&K No Burqa In Court : न्यायालयात युक्तीवादासाठी मुसलमान महिला अधिवक्ता बुरखा घालून आल्याने न्यायालयाने नियमांची करून दिली जाणीव !

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाच्या श्रीनगर खंडपिठात एक मुसलमान महिला अधिवक्ता एका खटल्यावर युक्तीवाद करण्यासाठी बुरखा घालून पोचली. त्यावर उच्च न्यायालयाने आक्षेप घेऊन तिला तिच्या चेहर्‍यावरून बुरखा काढण्यास सांगितले; परंतु महिला अधिवक्त्याने तसे करण्यास नकार दिला. ‘अशा पोशाखात न्यायालयात उपस्थित रहाणे, हा माझा मूलभूत अधिकार आहे’, असा दावा तिने केला. महिला अधिवक्त्याच्या या भूमिकेवर उच्च न्यायालयाने रजिस्ट्रार जनरल यांच्याकडून अधिवक्त्यांच्या पोशाखाविषयीचा कायदा आणि नियम यांची माहिती मागवली. त्यात असे आढळून आले की, अधिवक्त्यांसाठी ‘बार कौन्सिल ऑफ इंडिया’चे नियम अशा पोशाखांना अनुमती देत नाहीत. यानंतर उच्च न्यायालयाने महिला अधिवक्त्यांना न्यायालयामध्ये शिष्टाचार आणि व्यावसायिक ओळख पाळण्यास सांगितले.

संपादकीय भूमिका

नियमांचे उल्लंघन करून अशी कृती करणार्‍यांची पदवीच काढून घेण्याचा कायदा केला पाहिजे !