अस्टाना (कझाकिस्तान) – देशातील अक्ताऊ या ठिकाणी अझरबेजान एअरलाईन्सचे विमान दुर्घटनाग्रस्त होऊन मोठा अपघात झाला आहे. समुद्रकिनार्याच्या जवळ हे विमान कोसळले. या विमानात १०० हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानंतर वैमानिकाने आपत्कालीन लँडिंगसाठी सूचना केली होती; मात्र अक्ताऊपासून तीन किमी अंतरावर लँडिंग करत असतांनाच हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. अपघाताच्या ठिकाणी अग्नीशमनदल आणि बचावपथके तैनात करण्यात आली आहेत.