अध्यात्मविहीन ‍विध्वंसक विज्ञानावर साधना हेच उ‌त्तर !

‘विज्ञानातील शोधांमुळे सर्व देश एकमेकांचा विध्वंस प्रभावीपणे करू शकतात. याउलट साधना शिकल्यामुळे सर्व देशांतील पुढच्या पिढ्यांतील नागरिकांमध्ये एक कुटुंबभावना निर्माण होईल. त्यामुळे तिसर्‍या महायुद्धानंतर पृथ्वीवर सर्वत्र कुटुंबभावनाअसेल !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

येरवडा (पुणे) कारागृहात बंदीवानांसाठी अधिकृत ‘फोन बूथ’ सुविधा

कारागृह प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

आता बनावट बियाणे विकणार्‍यांना १० वर्षांची शिक्षा ! – अब्दुल सत्तार, कृषीमंत्री

यापुढे बनावट बियाणे विकणार्‍यांना १० वर्षांची शिक्षा होणार असून यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनात कायदा आणला जाणार आहे, अशी घोषणा त्यांनी केली आहे. येथील दैनिक ‘लोकमत’च्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त होत असलेल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी ते बोलत होते.

नाशिक येथे कंटेनरच्या धडकेत २ जैन साध्वींचा मृत्यू !

कंटेनरने प्रथम पिकअप, ओमनी गाडी आणि नंतर पायी चालणार्‍या साध्वींना धडक दिली. नाशिकला चातुर्मास करण्यासाठी त्या दोघी पायी जात होत्या.

पिंपरी महापालिकेचे साहाय्यक उद्यान निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कह्यात !

अशा लाचखोर अधिकार्‍यांवर बडतर्फीची कारवाई करायला हवी. ‘त्यांच्यावर कुणाचा वचक नसल्याने लाच घेण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत’, असेच कुणालाही वाटेल !

वारकर्‍यांच्या सेवेसाठी पिंपरी पालिकेकडून १२ पथके !

जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी वारकर्‍यांना विविध सेवासुविधा पुरवण्यासाठी महापालिका आयुक्तांनी १२० अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे.

दौंड शहरातून २ सहस्र ४२८ किलो गोमांस जप्त; ३ धर्मांधांसह एकाला अटक !

गोहत्या बंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही न होण्याचा परिणाम ! आतातरी गोहत्या करणार्‍यांना कठोर शिक्षा होणार का ?

शरद पवार यांना धमकी दिल्याप्रकरणी २ जणांवर गुन्हा नोंद !

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सामाजिक माध्यमावरून धमकी दिल्याप्रकरणी नर्मदाबाई पटवर्धन आणि सौरभ पिंपळकर यांच्यावर विविध कलमांअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संजय राऊत यांना धमकी देणारे दोघे कह्यात !

वस्त्रसंहितेद्वारे धार्मिक पालट !

महाराष्ट्रातील काही मंदिरांनी लागू केलेली वस्त्रसंहिता देशभरातील अन्य मंदिरांनीही लागू केल्यास धार्मिक उत्थानाच्या चळवळीला वेग येईल !

घरात आश्रय देऊन पीडितेवर अत्याचार करणार्‍या धर्मांधाला अटक !

महिलांनो, धर्मांधाच्या घरात आश्रय घ्यायचा कि नाही, ते ठरवा !