अफगाणिस्तानमध्ये भारतीय दूतावासातील अफगाणी कर्मचार्यांवर आक्रमण
काबुल – अफगाणिस्तानातील जलालाबाद येथील भारतीय वाणिज्य दूतावासात काम करणार्या अफगाणी कर्मचार्यांवर अज्ञात बंदूकधार्यांनी आक्रमण केले. यामध्ये ३ कर्मचार्यांचा मृत्यू झाला, तर एक जण घायाळ झाला आहे. अद्यापपर्यंत कोणत्याही गटाने या आक्रमणाचे दायित्व घेतलेले नाही.
भारत सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. जलालाबादमधील भारतीय वाणिज्य दूतावास वर्ष २०२० मध्ये अधिकृतपणे बंद करण्यात आला होता. तथापि अफगाणी नागरिकांचे एक पथक दूतावासाशी संबंधित कामे हाताळत होते. सध्या भारतीय दूतावास केवळ काबुलमध्ये कार्यरत आहे. तिथे भारतीय कर्मचारी रहातात.