हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनोज खाडये यांचे सांगली जिल्हा जनसंपर्क अभियान !
सांगली – हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभाग, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांचे सांगली जिल्ह्यात जनसंपर्क अभियान पार पडले. यात ठिकठिकाणी व्यापारी, उद्योजक, हिंदुत्वनिष्ठ यांच्या बैठका, वैयक्तिक संपर्क, व्याख्यान यांद्वारे प्रबोधन करण्यात आले. या प्रबोधनामुळे व्यापारी-उद्योजक यांनी ‘हलाल शिक्का’ असलेली उत्पादने विक्रीस न ठेवण्याचा निश्चय केला. ‘हलाल’ संदर्भात व्यापक जनजागृती करू, तसेच प्रत्येकानेच राष्ट्र आणि धर्म कार्यात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला.
१. मिरज येथे समर्थभक्त श्री. माधवराव गाडगीळ, हिंदुत्वनिष्ठ श्री. दिगंबर कोरे उपस्थित होते. या दोघांनीही ‘धर्मकार्यात सहभागी होऊ आणि प्रत्यक्ष कृती करतो’, असे सांगितले.
२. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे पुजारी श्री. सदाशिव ढवळेगुरुजी यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत ‘हलाल जिहाद’ची भीषणता श्री. मनोज खाडये यांनी विषद करून सांगितली. ‘पुढच्या वेळी अधिक जणांना एकत्र करून आम्ही मार्गदर्शन आयोजित करू’, असे सर्वांनी ठरवले. या प्रसंगी श्री. अवधूत कुलकर्णी, श्री. अमित गवळी, श्री. प्रतिक धनवडे उपस्थित होते.
३. विश्रामबाग येथील ‘ऋतुरंग हॉल’ येथे धर्मप्रेमींना श्री. मनोज खाडये यांनी मार्गदर्शन केले.
४. डफळापूर येथे ‘श्री सवदे बंधू हॉल’ येथे जिज्ञासूंना हिंदु धर्माची सद्यःस्थिती, मंदिर सरकारीकरण, वक्फ कायदा यांसह विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. मार्गदर्शन ऐकल्यावर येथील युवकांनी प्रत्यक्ष कृती करण्याचा निर्धार केला.
५. पलूस येथे श्री चौडेंश्वरी मंदिर येथे ‘हलाल जिहाद’ आणि ‘वक्फ कायदा’ यांवर मार्गदर्शन करण्यात आले. येथे १०० जिज्ञासूंची उपस्थित होती.
६. आमणापूर राष्ट्रप्रेमी श्री. कुलकर्णी यांनी पुढील वेळेस व्यापक नियोजन करण्याचा निर्धार व्यक्त केला.
(सौजन्य : Digital Entertainment)
७. गोवा येथे होणार्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या निमित्ताने सांगली येथील ‘सी केबल’वर श्री. मनोज खाडये यांची विशेष मुलाखत घेण्यात आली.
विशेष
१. पलूस येथे ‘केदार फौंड्री, पलूस’ येथील उद्योजकांना श्री. मनोज खाडये यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. या प्रसंगी श्री. सर्जेराव नलवडे, श्री. दिगंबर पाटील आणि इतर प्रमुख उद्योजक उपस्थित होते.
२. पलूस येथील ‘प्रगती इंजिनिअरींग वर्क्स’ यांच्या श्री. कृष्णा माळी आणि त्यांचे अधिकारी यांना श्री. मनोज खाडये यांनी मार्गदर्शन केले. यात ‘व्यवसाय करतांना त्याकडे साधना म्हणून कसे पहावे ?’, याविषयी मार्गदर्शन केले. ‘माझे कर्म हाच माझा धर्म’, तसेच आस्थापना ईश्वर चालवत आहे, असा दृष्टीकोन ठेवून कार्य केल्यास आपण नियमित आनंदी राहू शकतो. आस्थापनात काम करतांना आपण किती प्रामाणिकपणे कार्य करतो, याकडे सातत्याने लक्ष केंद्रीत करू शकतो. यानुसार ‘आस्थापनेत माझ्या वाट्यास आलेले कर्म आणि तोच आपला धर्म’, असे श्री. मनोज खाडये यांनी मार्गदर्शन केले.