शिर्डी येथील मंदिर न्यास राज्य परिषदेत मंदिरांद्वारे धर्मप्रसार करण्याचा शेकडो विश्वस्तांचा निर्धार !
शिर्डी, २५ डिसेंबर (वार्ता.) – समाजाला आध्यात्मिक ऊर्जा देणारी मंदिरे यापुढे धर्मशिक्षणाची केंद्रे करण्याचा निर्धार शिर्डी येथील मंदिर न्यास राज्य परिषदेत एकवटलेल्या मंदिरांच्या शेकडो विश्वस्तांनी केला. यासाठी मंदिरांमध्ये धर्मप्रसाराचे विविध उपक्रम राबवण्याचा निर्णय विश्वस्तांनी घेतला. १०८ मंदिरांत धर्मशिक्षण फलक लावण्याचा, तर ९८ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता (मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्या कपड्यांच्या संदर्भातील नियमावली) लागू करण्याचा निर्णय विश्वस्तांनी घेतला आहे. मंदिर महासंघाच्या वतीने ही माहिती देण्यात आली. या वेळी मंदिरांचे विश्वस्त, पदाधिकारी मिळून ८७५ हून अधिक जणांनी सहभाग घेतला. २५ डिसेंबर या दिवशी मंदिर न्यास परिषदेचा समारोप झाला. राष्ट्र आणि धर्म यांवर आघात झाल्यास राज्यातील ४९ ठिकाणी तात्काळ आंदोलन करण्याची सिद्धता मंदिर विश्वस्तांनी दर्शवली आहे.
५ मंदिरांमध्ये बालसंस्कारवर्ग चालू करण्याचा निर्णय विश्वस्तांनी घेतला आहे.
‘मंदिर तेथे सामूहिक आरती’ यासाठी विश्वस्त करणार प्रयत्न !
हिंदु धर्म आणि राष्ट्र यांवरील विविध आघातांविषयी हिंदूंनी सतर्क व्हावे आणि त्यांविरोधात त्वरित संघटित व्हावेत, यांसाठी ‘मंदिर तेथे सामूहिक आरती’ ही संकल्पना राज्यभर राबवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शिर्डी येथे महाराष्ट्र मंदिर न्यास राज्य परिषदेत आलेल्या विश्वस्तांनी घेतला आहे. या अनुषंगाने १२६ मंदिरांच्या विश्वस्तांनी सामूहिक आरती करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोल्हापूरमधील १ सहस्र मंदिरांच्या विश्वस्तांना कार्याशी जोडणार !
महाराष्ट्र मंदिर महासंघाशी जोडलेल्या विश्वस्तांनी कोल्हापूरमधील १ सहस्र मंदिरांच्या विश्वस्तांना संपर्क करण्याचा निर्णय घेतला आहे. समयमर्यादा निश्चित करून हे संपर्क करण्यात येणार आहेत. विश्वस्तांना संपर्क करून त्यांना मंदिरांचे रक्षण आणि संवर्धन या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.
राजकारणात मतभेद असले, तरी धर्मरक्षणासाठी हिंदूंमध्ये एकजूटच हवी ! – पू. सुदर्शन महाराज कपाटे, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, ग्लोबल महानुभाव संघ
१. अतिक्रमण करतांना अहिंदू वारूळ बनवणार्या मुंग्यांप्रमाणे एकत्र येतात. हिंदू मात्र जातीपाती आणि राजकीय पक्ष यांमध्ये विभागले आहेत. राजकारणात मतभेद असले, तरी धर्मरक्षणासाठी हिंदूंमध्ये एकजूटच असायला हवी.
२. ‘मंदिराच्या रक्षणासाठी काय करता येईल ?’, याचा विचार प्रत्येक हिंदूने करायला हवा. मुसलमान जेथे अल्पसंख्य असतात, तेव्हा ते धर्मनिरपेक्ष असल्याचे दाखवतात; मात्र बहुसंख्य झाल्यावर ते अन्य धर्मियांचे धर्मांतर करून त्यांच्या धार्मिक स्थळांवर आक्रमण करतात.
३. मंदिर म्हणजे जेथे ईश्वराचा वास आहे, असे ठिकाण. मंदिरामध्ये मूर्तीची स्थापना करण्यापूर्वी हिंदु धर्मामध्ये त्या देवतेची तेथे प्रतिष्ठापना करण्यात येते. अन्य कोणत्याच पंथामध्ये त्यांच्या प्रार्थनास्थळी देवतेचे अधिष्ठान असण्याची संकल्पना नाही.
Even if there are political differences, Hindus must unite for the protection of Dharma! – Pujya Sudarshan Maharaj Kapate, State Vice President, Global Mahanubhava Sangh, Maharashtra
We will establish a Hindu nation only by freeing temples from encroachments!
– Trustees’… pic.twitter.com/pIPNDH6VcM— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 25, 2024
४. महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्ण स्वत: अवतार असूनही महाभारतामध्ये त्यांनी शस्त्र हातात घेतले नाही, तर अर्जुनाला शस्त्र उचलायला प्रवृत्त केले. हिंदू हे धर्माविषयी जागृत व्हावेत, यासाठी हे आघात आहेत. हिंदूंनी एकत्र येऊन या आघातांना प्रत्युत्तर द्यायला हवे.
५. केवळ अहिंदू नव्हे, तर ‘सेक्युलॅरिझम’ची (धर्मनिरपेक्षतावादाची) विचारधारा बाळगणार्या प्रत्येकाचा हिंदु धर्माला धोका आहे. ‘सेक्युरिझम’च्या नावाखाली हे हिंदूंच्या प्रार्थनास्थळांचे महत्त्व न्यून करण्याचा प्रयत्न करत आहेत.
६. हिंदूंनी एकत्र आल्यावर हिंदूंनी राजकारणाविषयी नव्हे, तर सनातन धर्माविषयी चर्चा करण्याची आवश्यकता आहे. मंदिरांच्या रक्षणासाठी मंदिर-न्यास परिषद कार्य करतच आहे; मात्र या कार्यात प्रत्येक धर्माभिमानी हिंदूने योगदान द्यायला हवे.’’
प्रसारमाध्यमांनी संवेदनशील बनणे आवश्यक ! – श्रीमती सरिता कौशिक, संपादिका, ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनी
१. प्रसिद्धीमाध्यम म्हणजे काय ? हे समजून घ्यायला हवे. वृत्तपत्र, दूरदर्शन आणि डिजिटल माध्यम ही प्रसारमाध्यमे आहेत; मात्र या सर्वांमध्येच पालट होत आहे. त्यामुळे या पालटाचे सातत्याने अवलोकन करायला हवे.
२. काळानुरूप स्वतःला पालटणे आवश्यक असल्याने वृत्ताचे स्वरूपही प्रत्येक प्रसारमाध्यमानुसार पालटायला हवे.
३. वृत्तपत्राला लेखी स्वरूपातील पूरक माहिती आवश्यक असते, तर दूरदर्शनसाठी दृश्य स्वरूपातील माहिती लागते. सोहळा, उत्साह, गर्दी यांना दूरदर्शनमध्ये महत्त्वाचे स्थान मिळू शकते. डिजिटल माध्यम हे दोन्हीचे मिश्रण असल्याने तशा पद्धतीची माहिती द्यायला हवी.
४. राजकारण आणि समाजकारण यांमध्ये सर्वसामान्यांना अधिक रूची असते. त्यामुळे प्रसिद्धीमाध्यमांचे लक्षही तिकडे अधिक असते. आपल्या उपक्रमासाठी किंवा कार्यक्रमासाठी प्रसिद्धीमाध्यमांचे लक्ष वेधून घेण्यासाठी पूर्वनियोजन असणे आवश्यक आहे.
५. प्रत्येक संस्थेचा प्रसिद्धी प्रतिनिधी असणे आवश्यक आहे. जेणेकरून तो प्रसिद्धीमाध्यमांशी सातत्याने संपर्कात राहील. प्रसिद्धीमाध्यमांचे शिक्षण घडवून आणणे आवश्यक असून त्यांना संवेदनशील करणे महत्त्वाचे आहे.
६. वृत्त पाठवतांना ती आकर्षक व्हायला हवीत. वृत्ताचे महत्त्व पटवून देता आले पाहिजे. त्याचसमवेत सामाजिक माध्यमांमध्ये सक्रीय असणेही आवश्यक आहे. यामुळे प्रसारमाध्यमांवरचे अवलंबित्व न्यून होईल. उपक्रमाचे वृत्त तात्काळ द्यायला हवे.
मंदिर सदस्य नोंदणी आणि मंदिर महासंघाच्या ‘सोशल मिडिया सेल’ यांचा प्रारंभ !मंदिर परिषदेत दुसर्या दिवशी पहिल्या सत्रात मंदिर महासंघाच्या सदस्य नोंदणीचा प्रारंभ करण्यात आला, तसेच मंदिर महासंघाच्या ‘फेसबूक पेज’, ‘इन्स्टाग्राम’, तसेच ‘एक्स’च्या खात्याचा प्रारंभ सनातन संस्थेच्या धर्मप्रसारक सद्गुरु स्वाती खाडये, तारकेश्वर गडाचे मठाधिपती पू. आदिनाथ शास्त्री; मल्हारा, अचलपूर येथील श्री धरमाळ संस्थानचे महंत देवरावबाबा; संजीवनी गडाचे महंत पू. शंकर महाराज आणि पुणे येथील ‘ओम जय शंकर आध्यात्मिक प्रतिष्ठान’ मठाचे प.पू. पप्पाजी पुराणिक महाराज यांच्या वंदनीय उपस्थितीत करण्यात आले. यासाठी एक ‘क्यूआर् कोड’ (क्वीक रिसपॉन्स कोड – माहिती अथवा माहितीची लिंक संरक्षित करण्यासाठी सांकेतिक क्रमांक) देण्यात आला असून त्याद्वारे थेट नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याच समवेत ‘सनातन पंचांग २०२५’च्या अँड्राईड (Android) आणि आय.ओ.एस्. (iOS ) ॲपचे उद्घाटन करण्यात आले. |
महाराष्ट्र मंदिर महासंघाचे प्रसिद्धीपत्रक –
|