यंदा जगात सर्वाधिक सकल देशांतर्गत उत्पादन भारताचे असणार !

वॉशिंग्टन (अमेरिका) – वर्ष २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये जगात सर्वाधिक सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच जीडीपी हे भारताचे असेल, असा अंदाज ‘वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स’ने वर्तवले आहे. त्याने ट्वीटद्वारे ही माहिती दिली. भारताची अर्थव्यवस्था ५.९ टक्क्यांनी वधारेल. दुसर्‍या क्रमांकावर चीन असून त्याचा जीडीपी हा ५.२ टक्के असेल. त्यानंतर इंडोनेशिया (५ टक्के), नायजेरिया (३.२ टक्के) आणि सौदी अरेबिया (३.१ टक्के) या देशांचा क्रमांक लागतो.

या सूचीत अमेरिकेची अर्थव्यवस्था केवळ १.६ टक्क्यांनी वाढेल, असे सांगण्यात आले असून जर्मनी आणि युनायटेड किंगडम यांचा जीडीपी हा अनुक्रमे ०.१ टक्का आणि ०.३ टक्के घसरणार असल्याचे म्हटले आहे.