नवसारी (गुजरात) येथे गोमांस भरलेले सामोसे विकणार्‍या मुसलमानाला अटक

गोमांसाने भरलेले सामोसे घेऊन जाणार्‍या एका लॉरीला पोलिसांनी कह्यात घेऊन या प्रकरणी अहमद मोहंमद सुज याला अटक केली आहे. गोरक्षकांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली.

अमरनाथ यात्रेला १ जुलैपासून प्रारंभ

गेल्या काही वर्षांपासून या यात्रेला आतंकवादी लक्ष्य करत आहेत. अमरनाथ यात्रेच्या रस्त्यांवर आतंकवाद्यांच्या आक्रमणाचे सावट असणे, हे लज्जास्पद होय !

साक्षी आणि अनुराधा यांची हत्या करणार्‍या लव्ह जिहाद्यांना त्वरित फाशी द्यावी, या मागणीसाठी मंचर (पुणे) येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन !

देहलीमध्ये साक्षी नावाच्या तरुणीची २५ वेळा चाकू भोसकून आणि तीन वेळा दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. झारखंडमध्ये अनुराधा नावाच्या तरुणीला चौथ्या मजल्यावरून ढकलून हत्या करण्यात आली.

 बालिंगा (जिल्हा कोल्हापूर) येथे सराफाच्या दुकानावर फिल्मी स्टाईल सशस्त्र दरोडा !

एका मागोमाग एक दरोडे पडणे, हे गुन्हेगारांना कायद्याचे भय नसल्याचे द्योतक ! गुन्हेगारांना त्वरित आणि कठोर शिक्षा झाल्यासच असे प्रकार थांबतील !

१६ ते २२ जून या कालावधीत गोवा येथे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी प्रतिवर्षीप्रमाणे १६ ते २२ जून या कालावधीत ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे एकादश ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ अर्थात् ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे.

समाजातील युवा पिढीने थोर पुरुषांचे विचार पुढे नेण्याचे कार्य करावे ! – अजित पवार

कळस येथे स्वराज्य रक्षक श्री छत्रपती संभाजी महाराज, श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज यांच्या शिल्पाचे अनावरण अजित पवार यांच्या हस्ते झाले.

आरोग्य विज्ञान विद्यापिठात हरकती आल्यामुळे ९ सिनेट सदस्यांच्या नियुक्त्या रद्द !

विद्यापिठात असे होणे अशोभनीय आहे ! संबंधितांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे !

छत्रपती शिवरायांचा आदर्श ठेवून पुढील पिढीला सुरक्षित वातावरण निर्माण करून देणे आपले धर्मकर्तव्य ! – विपुल भोपळे, हिंदु जनजागृती समिती

छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून हिंदूंना सुरक्षित केले. त्यांना स्वाभिमान मिळवून दिला. याचाच आदर्श घेऊन हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी होऊन पुढच्या पिढीला सुरक्षित आणि स्वाभिमानी वातावरण निर्माण करून देणे, हे आपले धर्मकर्तव्य आहे.

(म्हणे) ‘भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश मिळून अखंड भारत झाला, तर मुसलमान पंतप्रधान होईल !’ – शोएब जमाई

‘अखंड भारता’कडे मुसलमान कोणत्या दृष्टीने पहातात, हे हिंदूंनी लक्षात घेण्यासारखे आहे. याचा विचार करूनच भारताला प्रथम हिंदु राष्ट्र करून देशात हिंदूंची स्थिती भक्कम करण्याची का आवश्यकता आहे, हे लक्षात येते !

नव्या विश्वस्त मंडळाला धर्मादाय आयुक्तांनी दिली अनुमती !

जेजुरी संस्थानमधील विश्वस्तपदांच्या नियुक्तीवरून संघर्ष करावा लागल्यानंतर जेजुरीकरांच्या लढ्याला यश मिळाले आहे. नुकत्याच झालेल्या निर्णयानुसार, जेजुरी संस्थानच्या विश्वस्तपदी जेजुरीतील ५ ग्रामस्थ आणि बाहेरच्या ५ जणांची नियुक्ती होणार आहे.