देशात तात्काळ ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा करा !

रत्नागिरीत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासनाला निवेदन

रत्नागिरी, १० जून (वार्ता.) – देहलीत साक्षी या हिंदु तरुणीला साहिल खान या नराधमाने २५ वेळा चाकूने भोसकून तिची निर्दयीपणे हत्या केली. अशीच घटना झारखंडमध्ये १५ वर्षीय अनुराधा या मुलीवर मोहम्मद कैफ अन्सारी आणि मोहम्मद आशिक अन्सारी यांनी सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करून विहिरीत फेकून दिल्याचे उघडकीस आले आहे. अशा केवळ या एक – दोन घटना नसून देशभरात अशा घटनांची मालिकाच चालू आहेत. या घटना देशभरात युवतीमध्ये दहशत निर्माण करणार्‍या आहेत.

अनेक हिंदु मुलींची हत्या करणार्‍या धर्मांध लव्ह जिहाद्यांना तात्काळ फासावर लटकवा आणि देशात तात्काळ ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा करा, अशी मागणी येथील हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली. या मागणीचे निवेदन येथील निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांना ७ जून या दिवशी देण्यात आले. हे निवेदन देतांना समितीचे सर्वश्री चंद्रशेखर गुडेकर, हिंदुत्वनिष्ठ चंद्रकांत राऊळ, सनातन संस्थेचे रमण पाध्ये, धर्मप्रेमी प्रवीण बोरकर आणि अशोक पाटील उपस्थित होते.