धर्माधारित हिंदु राष्ट्रासाठी धर्मशिक्षण आणि एकत्रित प्रयत्न आवश्यक ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

. . . हे कळल्यावर प्रत्येक हिंदूला धर्माचा इतका अभिमान वाटेल की, तो धर्म पालटणार नाही, तसेच आपल्या मुली ‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्रात अडकणार नाहीत !

(म्हणे) ‘आमचे सरकार आल्यास बजरंग दल आणि ‘पी.एफ्.आय.’वर बंदी घालू !’ – कर्नाटक काँग्रेस

देशप्रेमी बजरंग दल आणि देशद्रोही ‘पी.एफ्.आय.’ यांना एकाच मापात तोलणार्‍या काँग्रेसचा निषेध !

(म्हणे) ‘केरळमधील ३२ सहस्र महिलांनी इस्लाम स्वीकारल्याचा पुरावा द्या आणि १ कोटी रुपये मिळवा !’ – काँग्रेसचे नेते शशी थरूर

काश्मीरमधील लक्षावधी काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदावर चकार शब्दही न बोलणार्‍या थरूर यांची हीच का धर्मनिरपेक्षता ?

शरद पवार यांच्याकडून पक्षाध्यक्षपदाचे एकाएकी त्यागपत्र !

उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी शरद पवार यांनी पदाचे त्यागपत्र मागे  घेण्याची गळ घातली , अजित पवार यांनी मात्र भावनात्मक न होता शरद पवार यांच्या त्यागपत्राच्या भूमिकेचे समर्थन केले.

राजकीय ‘लव्ह जिहाद’ झालेले ‘द केरल स्टोरी’ला विरोध करत आहेत ! – नितेश राणे, आमदार, भाजप

संजय राऊत आणि ठाकरे सेनेला महाराष्ट्रात पाकिस्तानचा ‘अजेंडा’ (धोरण) चालवायचा आहे. ‘माय नेम इज खान’ ला विरोध करणारी शिवसेना आज ‘कश्मीर फाईल्स’, ‘द केरल स्टोरी’ला विरोध करत आहे, कारण या लोकांचा राजकीय ‘लव्ह जिहाद’ झालेला आहे.

गोवा : बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या सुविधांसाठीचा ५०० कोटी रुपयांचा निधी विनावापर पडून !

बांधकाम क्षेत्रात काम करणारे बहुतांश कामगार अत्यंत हालाखीचे जीवन जगत असतांना त्यांच्या कल्याणासाठी देण्यात आलेला ५०० कोटी रुपयांचा निधी सरकारच्या तिजोरीत विनावापर पडून ! ही माहिती स्वतः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीच दिली !

गोवा : बेतोडा येथे चारचाकी, तर कुंडई येथे कंटेनर उलटून भीषण अपघात

गोव्यात गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे सत्र चालूच आहे. कुंडई येथे याच ठिकाणी वर्षभरात १०० अपघात घडतात; पण ते रोखण्यासाठी सरकार कोणतीही उपाययोजना करत नाही, असा स्थानिक ग्रामस्थांचा आरोप आहे.

आता ‘पी.एम्.पी.’ घडवेल पुणे येथील धार्मिक स्‍थळांची यात्रा !

प्रवाशांना आता ‘पी.एम्.पी.’द्वारे धार्मिक आणि पर्यटनस्‍थळांची यात्रा (सहल) घडणार आहे. प्रतिसप्‍ताहाच्‍या शनिवार आणि रविवार, तसेच शासकीय सुट्ट्यांच्‍या दिवशी या सहलींचे आयोजन करण्‍यात आले आहे.

नाशिक महापालिका आयुक्त मारहाण प्रकरण आमदार बच्चू कडू यांच्या शिक्षेला स्थगिती !

जिल्हा सत्र न्यायालयाने सरकारी कामात अडथळा आणि अधिकार्‍यांसमवेत गैरवर्तणूक केल्याप्रकरणी ५ सहस्र रुपयांचा दंड आणि १ वर्षांची शिक्षा सुनावली होती; मात्र या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.