‘द केरल स्टोरी’प्रमाणे ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपटही विनामूल्य दाखवा ! – आमदार जितेंद्र आव्हाड

द केरल स्टोरी’ चित्रपट ठिकठिकाणी विनामूल्य दाखवला जात आहे; पण ‘महाराष्ट्र शाहीर’ हा शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित असणारा चित्रपटही विनामूल्य दाखवावा. महाराष्ट्राची परंपरा लोकांना कळू द्या, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले

शिवमहापुराण कथास्थळी चोऱ्या करणाऱ्या १० महिलांना अटक !

पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुराण कथेला ५ मे या दिवशी प्रारंभ झाला. त्यासाठी राज्यातून लाखो महिला भाविक येत आहेत. गर्दीचा अपलाभ घेत महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या महिलांची टोळीच सक्रिय झाली आहे.

खासगी शिकवणी घेणार्‍यांच्या विरोधात ‘दुहेरी शिक्षकविरोधी लढा कृती समिती’ याचिका प्रविष्ट करणार !

कोल्हापूर जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण भागात अनेक ठिकाणी जे शिक्षक कार्यरत आहेत, ते सेवा-अटी यांचा भंग करून खासगी शिकवण्या घेतात. शासनाचा २६ एप्रिल २००० च्या परिपत्रकानुसार शाळेत शिकवणार्‍या शिक्षकास खासगी शिकवणी घेण्यास शासनाने अटकाव केला आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाला महिला आणि तरुणी यांचा उदंड प्रतिसाद !

७ मे या दिवशी सकाळी ८ वाजता सेव्हन हिल्स परिसरातील ‘द केरल स्टोरी’ चित्रपट प्रदर्शित झालेल्या चित्रपटगृहाचे प्रांगण हिंदु महिला-तरुणी यांनी भरले होते. या चित्रपटाला महिला आणि तरुणी यांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

नाशिक येथील पांजरपोळ जागेच्या सर्व्हेत अडीच लाख झाडांची नोंद !

चुंचाळे येथील पांजरपोळची जागा उद्योगांसाठी देण्याचे सूत्र चर्चेला आल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ‘गायींसाठी जागा राखीव ठेवून उर्वरित जागा उद्योगांसाठी घ्या’, यासाठी सर्वेक्षणाचे आदेश दिले होते. त्यानंतर गेल्या मासाच्या  शेवटच्या आठवड्यात सर्वेक्षण चालू झाले.

सोयीचा जबाब देण्यासाठी नाशिक पोलिसांकडून अपंग व्यक्तीवर दबाव !

नाशिक पोलिसांचा उद्दामपणा आणि असंवेदनशीलता ! अशांना तत्काळ निलंबित करायला हवे !

भाग्यनगर येथे हत्येसाठी नेण्यात येणारे ११४ उंट नाशिक येथे कह्यात !

जे अ‍ॅनिमल वेल्फेअर पथकाला दिसते, ते सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या पोलिसांना का दिसत नाही ? पोलिसांची गुप्तचर यंत्रणा झोपली आहे का ? या प्रकरणी दोषी पोलीस अधिकार्‍यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे !

कोल्हापूर येथे ‘सकल हिंदु समाजा’च्या वतीने ‘द केरल स्टोरी’चे विनामूल्य आयोजन !

प्रेमाच्या जाळ्यात फसवून ‘इस्लामिक स्टेट’सारख्या धोकादायक आतंकवादी संघटनेत सहभागी करून घेण्यासाठी नेण्यात आलेल्या १-२ नव्हे, सहस्रावधी हिंदु आणि ख्रिस्ती युवतींचा ‘लव्ह’पासून ते ‘जिहाद’पर्यंत भयावह प्रवास या चित्रपटात मांडण्यात आला आहे.

सांताक्रूझ (मुंबई) येथे धर्मांधाकडून हिंदु प्रेयसीवर भररस्त्यात चाकूने आक्रमण !

लव्ह जिहादवर आधारित ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाला विरोध करू पहाणार्‍यांनी या घटनेविषयीही बोलावे !

संयुक्त शाहूपुरीच्या वतीने भव्य छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाचे आयोजन !

प्रथमच शाहूपुरीतील ४५ मंडळांना एकत्र करून हा उत्सव साजरा करण्यात येत आहे. या उत्सवासाठी परिसरातील अनेक मंडळे आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये अमाप उत्साह दिसून येत आहे.