Sant Sammelan Solapur Maharashtra : हिंदु राष्ट्र निर्माणासाठी देशभरातील हिंदू आता जागा होत आहे ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

सोलापूर : आम्ही जातीपातींत विभागले गेलो, त्यामुळे धर्माचे शिक्षण दिले नाही. त्यामुळे काश्मीरमधून पंडितांना पलायन करावे लागले, मणीपूर जळाले आणि बंगालमधील अत्याचार वाढले. हिंदु राष्ट्र निर्माणासाठी देशभरात आता हिंदू जागा होत आहे. अन्याय आणि उपद्रव करणार्‍या धर्मविरोधकांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देण्यासाठी हिंदू आता पुढे येत आहे. आम्ही केवळ हिंदु राष्ट्र संकल्पाची भाषा बोलतो. हे राष्ट्र ज्यांना मान्य नाही, त्यांनी पाकिस्तानात चालते व्हावे. हवे तर त्यांना आम्ही पाकिस्तानचे तिकीट काढून देऊ, असे मार्गदर्शन मध्यप्रदेशातील छत्तरपूर येथील बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी केले. ते येथील ‘होम’ मैदानावर महाराष्ट्र साहित्य परीषद, सोलापूर शाखा आणि ‘श्री बागेश्‍वर धाम सेवा समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या संत संमेलनात बोलत होते.

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री पुढे म्हणाले,

‘‘हिंदवी स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी विखुरलेल्या हिंदूंना आणि १८ पगड जातींना एकत्र करून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. यातूनच प्रेरणा घेऊन मी अखंड हिंदुस्थानात पदयात्रा काढत हिंदूंचे एकत्रीकरण करण्यासाठी फिरत आहे. ज्याचे चरित्र स्वच्छ असेल तोच हिंदू होय. माझे आयुष्य हिंदुत्व आणि सनातन यांसाठी समर्पित आहे. हिंदुत्वनिष्ठ विचारांनीच भगवा फडकवता येणार आहे. तिरुपती बालाजीच्या प्रसादामध्ये गोमातेची चरबी मिसळण्याचे काम करणारे, तरुणींची जनावरांप्रमाणे कत्तल करणार्‍यांनाही धडा शिकवावा लागणार आहे.’’

(सौजन्य : Bageshwar Dham Sarkar)

विशेष

शेवटी ‘हम सब हिंदू एक है’, ‘जातपात की करो बिदाई हम सब हिंदू भाई भाई’, ‘छेडेंगे तो, छोडेंगे नही’, ‘अब हमे भागना नही, जागना है’, अशा घोषणा देण्यात आल्या. अन्य धर्मीय प्रार्थनेसाठी एकत्र जमतात, आपणही त्यातून बोध घेत एकत्र जमावे, असे आवाहन पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी केले.

या वेळी रेणुका महागावकर, सर्वश्री प्रशांत बडवे, जितेश कुलकर्णी, बागेश्‍वर सेवा समितीचे संजय साळुंखे, पंचांगकर्ते मोहन दाते, अविनाश महागावकर इत्यादी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.