महाराष्ट्रातील २ बंदरांना ‘सागर श्रेष्ठ सन्मान’ पुरस्कार

महाराष्ट्रातील ‘मुंबई बंदर प्राधिकरण’ आणि ‘जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण’ या दोन बंदरांना वर्ष २०२२-२३ मध्ये उत्कृष्ट कार्याविषयी केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्गमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी १० मे या दिवशी ‘सागर श्रेष्ठ सन्मान’ पुरस्काराने सन्मानित केले. येथील इंडिया इंटरनॅशनल केंद्रामध्ये केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

वाचणार्‍याला कळत नाही इतकी सर्वोच्च न्यायालयाची भाषा गुंतागुंतीची !  – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

नोटिसा येतात तेव्हा त्यांतील भाषा वाचल्यावर ‘मला सोडले आहे कि अटक केली ?’, हेच कळत नाही, इतकी ती भाषा गुंतागुंतीची असते, असे वक्तव्य मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.

छत्रपती संभाजीनगर येथे उत्तरपत्रिकांत हस्ताक्षरांत पालट !

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता १० वी आणि १२ वी इयत्तेच्या परीक्षांचे निकाल तोंडावर असतांना उत्तरपत्रिकांतील हस्ताक्षर पालट आणि कथित अपप्रकारांवर मंडळाच्या येथील कार्यालयात सुनावणी चालू झाली आहे.

हिंडेनबर्गने मॉरिशसमधील अदानी उद्योग समूहावर केलेले आरोप निराधार ! – मॉरिशस

‘हिंडेनबर्ग रिसर्च’ने मॉरिशसमध्ये अदाणी समूहावर केलेले आरोप ‘खोटे आणि निराधार’ आहेत’, असे मॉरिशसचे आर्थिक सेवा मंत्री महेनकुमार सेरुत्तून् यांनी त्यांच्या संसदेत सांगितले.

दाऊदच्या हस्तकांद्वारे मुंबई आणि ठाणे येथे बनावट नोटांची छपाई, ६ ठिकाणी धाडी !

भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी करणार्‍या संबंधित आरोपींना कठोर शिक्षाच करायला हवी ! या यंत्रणेचे संपूर्ण जाळेच उद्ध्वस्त करायला हवे !

महानुभाव पंथाचे मी आणि सर्व साधक सनातन हिंदु धर्मासाठी साहाय्य करण्यास कटीबद्ध आहोत ! – सुदर्शन महाराज कपाटे, महानुभाव पंथ

अधिवेशनाचे उद्घाटन महानुभाव पंथाचे सुदर्शन महाराज कपाटे, सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे पू. अधिवक्ता सुरेश कुलकर्णी यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने झाले. या वेळी व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट हेही उपस्थित होते.

शरद पवार आणि नैतिकता यांचा संबंध काय ? वसंतदादा पाटील यांचे सरकार कसे गेले ? – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शरद पवार हे जर भाजपला नैतिकता शिकवत असतील, तर इतिहासात जावे लागेल. माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांचे सरकार कसे गेले ?, येथून प्रारंभ होईल.

(म्हणे) ‘द केरल स्टोरी’च्या दिग्दर्शकाचे डोळे काढणार्‍याला २१ लाख रुपये देऊ !’ – ‘हक-ए-हिंदुस्तान मोर्चा’ या धर्मांध संघटनेची घोषणा

बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल (संयुक्त) यांचे हिंदुद्वेषी सरकार असल्याने अशा संघटनेवर कोणतीही कारवाई होणार नाही, हे निश्‍चित !

देशात हिंदूंखेरीज कुणालाही पंतप्रधान, मुख्यमंत्री आदी होता येणार नाही, अशी घटनेत दुरुस्ती करू ! – डॉ. प्रवीण तोगडिया

देशात हिंदूंखेरीज कुणालाही पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, न्यायाधीश होता येणार नाही, अशी घटनेत दुरुस्ती करून घेऊ.

(म्हणे) ‘भारतात मुसलमानांच्या विरोधात द्वेषाला प्रोत्साहन दिले जात आहे !’ – अमेरिकेतील पाकिस्तानी दूतावासातील अधिकार्‍याचे हिंदुद्वेषी विधान

भारतावर कुरघोडी करण्याची एकही संधी न सोडणार्‍या पाकला भारताने जशास तसे उत्तर दिले पाहिजे !