Bulldozer In ‘Doon’ School : देहराडून (उत्तराखंड) : ‘डून’ शाळेत उभारलेल्या अवैध थडग्यावर सरकारचा बुलडोझर !

हिंदुत्वनिष्ठांनी विरोध केल्यावर प्रशासनाची तत्परतेने कारवाई !

देहराडून (उत्तराखंड) – येथील प्रतिष्ठित ‘डून स्कूल’मध्ये एका थडग्याचे (मजारीचे) बांधकाम चालू होते. स्थानिक हिंदुत्वनिष्ठांना ही माहिती मिळताच त्यांनी याचा निषेध केला आणि बांधकाम पाडण्याची मागणी केली. राज्यातील भाजप सरकारने याला गांभीर्याने घेत स्थानिक प्रशासनाने हे थडगे पाडले. ‘डून स्कूल’ हे भारतातील केवळ मुलांसाठीचे प्रतिष्ठित वसतीगृह शाळा (बॉयज बोर्डिंग स्कूल) म्हणून प्रसिद्ध आहे. त्याला आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त असून शाळेत असा प्रकार झाल्याने सर्वत्र आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांनुसार ज्या ठिकाणी थडग्याचे बांधकाम चालू होते, त्या ठिकाणी कुणालाही जाण्याची अनुमती नसल्याचे प्रशासनाच्या तपासात उघड झाले. ही जागा शाळेच्या शेजारी आहे. हे थडगे कोण बांधत होते, हे ठाऊक नाही, अशी प्राथमिक माहिती आहे. डेहराडूनचे जिल्हाधिकारी सविन बन्सल यांनी तपास पूर्ण झाल्यानंतर बांधकाम पाडण्याचे आदेश दिले. यापूर्वीही राज्यातील शेकडो अवैध थडग्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

अशी कारवाई सर्वत्र झाली पाहिजे, तसेच संबंधितांवर कठोर कारवाई केली पाहिजे !