सातारा येथे क्षत्रिय राजवंश राजपूत समाजाच्या वतीने क्रांतीसूर्य महाराणा प्रताप यांची ४८३ वी जयंती उत्साहात साजरी !

कार्यक्रमस्थळी क्रांतीसूर्य महाराणा प्रताप जयंती उत्सव समितीच्या वतीने हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुरेश पंडित यांचा श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने सासवड येथे ६०० हून अधिक मुली आणि महिलांना दाखवला ‘द केरल स्टोरी’ चित्रपट !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पुरंदर यांनी तिकीट काढून आतापर्यंत ६७० तरुण मुली आणि महिला यांसाठी सत्य घटनेवर आधारित असणारा ‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट दाखवला आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल घोषित !

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वर्ष २०२२ च्या परीक्षेचा निकाल २३ मे या दिवशी आयोगाकडून घोषित करण्यात आला.

मुंबईत प्रतिदिन हृदयविकारामुळे २६, तर कर्करोगामुळे २५ जणांचा मृत्यू !

वाढते मृत्यू टाळण्यासाठी आयुर्वेदीय जीवनशैलीचा अंगीकार करा !

‘धर्मवीर शंभूराजे’ पुण्यतिथीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून २ लाख ९९ सहस्र रुपये निधी संमत !

आमदार महेश लांडगे यांच्या विशेष प्रयत्नांतून प्रतीवर्षीच्या पुण्यतिथी कार्यक्रमासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने २ लाख ९९ सहस्र रुपये निधी संमत करण्यात आला.

दौंड (पुणे) येथे फैजान कुरेशी १ गाय आणि १६ वासरे घेऊन पसार

३ गायींचा जीव वाचवण्यात गोरक्षकांना यश

१२ वर्षे उलटूनही भूमीचा मोबदला नाहीच !

राज्य सरकारच्या टेंभू उपसा जलसिंचन प्रकल्पामध्ये कराड तालुक्यातील कोयना नदीकाठच्या सुपने, पश्चिम सुपने येथील बाधित शेतकर्‍यांच्या भूमींचे सर्वेक्षण १२ वर्षांपूर्वी पूर्ण झाले; मात्र अद्याप शेतकर्‍यांना भूमींचा कोणताही मोबदला मिळालेला नाही.

पायाभूत सुविधांच्या विकासासाठी राज्यात नवीन महामंडळाची स्थापना !

रस्ते, बंदरे, विमानतळ, रेल्वे, मेट्रो, वीज आदी २२ पायाभूत सुविधांच्या विकासासाठी राज्यशासनाने ‘महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाची (एम्.एस्.आय्.डी.सी.) स्थापना केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे हे महामंडळ संचलित केले जाईल.

#Exclusive : सावरकरांनी सांगितल्यानुसार हिंदूंनी जात-पात, प्रांत-भाषा विसरून एकत्र आल्यास त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

सावरकरांनी हिंदूंना एक संदेश दिला होता की, जर हिंदुस्थानला पुन्हा समर्थ आणि संपन्न बनवायचे असेल, तसेच सगळ्या अडचणींवर मात करायची असेल, तर हिंदूंनी जात-पात, प्रांत-भाषा हे सगळे विसरून एकत्र आले पाहिजे.

#Exclusive : हिंदु समाज क्षुद्र राजकारणात विभागला जाऊ नये, यासाठी हिंदूंनी स्वातंत्र्यवीर सावरकरांमधील ‘हिंदूसंघटक’ हा गुण अंगीकारणे महत्त्वाचे ! – विद्याचरण पुरंदरे, इतिहास अभ्यासक, पुणे

‘या देशाने तुम्हाला कोणत्या गोष्टीसाठी लक्षात ठेवावे ?’, असा प्रश्न विचारल्यावर सावरकर उत्तरले, ‘‘मला या देशाने ‘हिंदूसंघटक’ म्हणून लक्षात ठेवावे, अशी माझी इच्छा आहे !’’