खटल्‍यांच्‍या गतीमान निपटार्‍यासाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करू ! – मेघवाल, नवे कायदामंत्री

केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी कायदा मंत्रालयाची सूत्रे हाती घेतल्‍यावर ‘कामाचा प्राधान्‍यक्रम काय असेल ?’, यावर बोलतांना दिली.

लाचखोर सतीश खरे याने १०० कोटींची अवैध मालमत्ता जमवल्‍याचा आरोप !

शिंदे-फडणवीस सरकारच्‍या काळात भ्रष्‍ट अधिकार्‍यांना रंगेहात पकडण्‍याची मालिकाच चालू आहे. ५ लाखांपासून ते ३० लाख रुपयांची लाच घेण्‍यापर्यंत अधिकार्‍यांची मजल गेली आहे. तरीही मोठ्या प्रमाणात भ्रष्‍टाचाराची प्रकरणे उघडकीस येत आहेत.

मुंबईची हवा श्‍वास घेण्‍याच्‍या योग्‍यतेची नाही ! – प्रजा फाऊंडेशन

मुंबई शहराची हवा श्‍वास घेण्‍याच्‍या योग्‍यतेची नाही, याविषयीच्‍या अनेक तक्रारी मुंबई महापालिकेकडे करण्‍यात आलेल्‍या आहेत.

स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍या १४० व्‍या जयंतीच्‍या निमित्ताने २१ ते २८ मे या कालावधीत ‘विचार जागरण सप्‍ताहा’चे आयोजन !

स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍या १४० व्‍या जयंतीच्‍या निमित्ताने पर्यटन संचालनालय महाराष्‍ट्र शासन आणि विवेक व्‍यासपीठ यांच्‍या वतीने २१ ते २८ मे या कालावधीत सांगली येथे ‘विचार जागरण सप्‍ताहा’चे (वीरभूमी परिक्रमा) आयोजन करण्‍यात आले आहे.

महिला अत्‍याचारांशी संबंधित तक्रारींमध्‍ये १४० टक्‍क्‍यांनी वाढ !

माहितीच्‍या अधिकाराखाली (आर्.टी.आय.) मिळालेल्‍या माहितीनुसार, गेल्‍या ५ वर्षांत महिला अत्‍याचार गुन्‍ह्यांशी संबंधित तक्रारींमध्‍ये तब्‍बल १४० टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे.

देशातील ९५ सहस्र ९२९ घोटाळ्‍यांत ३२ सहस्र ९१ कोटींचा अपहार !

‘ऑनलाईन’ फसवणुकीसाठी पोलिसांत ‘सायबर क्राईम’ असा स्‍वतंत्र विभाग आहे; मात्र रिझर्व्‍ह बँकेत ‘ऑनलाईन’ फसवणुकीसाठी ‘सायबर क्राईम’ असे वर्गीकरणच नाही. वर्ष २०२२-२३ मध्‍ये आर्.बी.आय.अंतर्गत येत असलेल्‍या देशातील सर्व बँकांमध्‍ये एकूण ९५ सहस्र ९२९ घोटाळे झाले.

‘गृहरचना संस्‍थे’च्‍या आवारात भटक्‍या श्‍वानांच्‍या पुनर्वसनाच्‍या उच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशाला सर्वोच्‍च न्‍यायालयाची स्‍थगिती !

येथील वडगाव शेरीतील ‘ब्रह्मा सनसिटी सहकारी गृहरचना संस्‍थे’च्‍या आवारात ७ वर्षांच्‍या मुलावर भटक्‍या कुत्र्यांनी आक्रमण केल्‍यानंतर महापालिकेने तेथील ६० कुत्र्यांना पकडून सुरक्षित निवार्‍यात ठेवले होते.

(म्‍हणे) ‘कुख्‍यात गुंड अतिक अहमद याच्‍या नियंत्रणात असलेली अनेक एकर भूमी आम्‍हाला परत करा !’ – उत्तरप्रदेश शिया सेंट्रल वक्‍फ बोर्ड

मृत पावलेला कुख्‍यात गुंड अतिक अहमद आणि कारागृहात असलेला गुंड मुख्‍तार अंसारी यांनी वक्‍फ बोर्डाची अनेक एकर भूमी स्‍वत:च्‍या कह्यात घेतली होती. ‘ती पुन्‍हा आम्‍हाला देण्‍यात यावी’, अशी मागणी उत्तरप्रदेश शिया सेंट्रल वक्‍फ बोर्डाने मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांना पत्र लिहून केली आहे.

यापुढे मंदिरात घुसखोरीचा प्रयत्न झाल्‍यास हिंदु समाजाकडून सडेतोड उत्तर देऊ !

विहिंपचे राष्‍ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांची चेतावणी !

पुणे येथून गेल्‍या ३ मासांत ४४७ मुली आणि महिला बेपत्ता !

राज्‍य महिला आयोगाच्‍या अध्‍यक्षा रूपाली चाकणकर यांची पत्रकार परिषदेत माहिती