पुणे – प्रवाशांना आता ‘पी.एम्.पी.’द्वारे धार्मिक आणि पर्यटनस्थळांची यात्रा (सहल) घडणार आहे. प्रतिसप्ताहाच्या शनिवार आणि रविवार, तसेच शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी या सहलींचे आयोजन करण्यात आले आहे.
१ मे म्हणजेच ‘महाराष्ट्रदिनी’ या उपक्रमाचा प्रारंभ होत आहे. या उपक्रमासाठी ‘पी.एम्.पी.’च्या ७ ‘इलेक्ट्रीक वातानुकूलित बसगाड्यांचा उपयोग केला जाणार आहे.
एक दिवसाच्या सहलीसाठी प्रवाशांकडून ७०० ते १ सहस्र रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. बसच्या आसन क्षमतेनुसार संपूर्ण ३३ प्रवाशांचे सामूहिक तिकीट काढल्यास ५ प्रवाशांना मोफत प्रवास करता येईल. या बसमधून प्रवास करणार्यांना आपल्या घरापासून ते थांब्यापर्यंत, तसेच प्रवास संपवून घरी जाण्यासाठी बसमधून प्रवास केल्यास, तो प्रवास विनामूल्य असेल. प्रत्येक बसमध्ये ‘गाईड’ची (स्थळांची माहिती सांगणारी व्यक्ती) नियुक्तीही केली जाईल.