भारताला विश्व गुरु बनवण्यासाठी अध्यात्माद्वारे मने प्रज्वलित करणे आवश्यक ! – गोविंद गावडे, कला आणि संस्कृती मंत्री, गोवा

प्रत्येकाचे मन प्रज्वलित करण्यासाठी अध्यात्माची आवश्यकता आहे. हे सामूहिक सहभागातून झाल्यास भारताला विश्वगुरु बनवता येईल. हा संदेश तळागाळापर्यंत प्रत्येकापर्यंत पोचवला पाहिजे, असे आवाहन गोव्याचे कला आणि संस्कृती मंत्री श्री. गोविंद गावडे यांनी केले.

आय.पी.एल्. सामन्यावर सट्टा लावणार्यांवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई !

पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने खराडी परिसरातील ‘गॅलेक्सी वन’ या सोसायटीमधील नवव्या माळ्यावरील एका सदनिकेवर धाड टाकून आय.पी.एल्. क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणार्‍या टोळीला कह्यात घेतले.

प्राथमिक शाळांमध्ये ‘स्काऊट गाईड’ अनिवार्य करणार ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

व्यक्तीमत्त्व विकास आणि कौशल्य यांवर आधारित प्रशिक्षणासाठी प्राथमिक शाळांमध्ये ‘स्काऊट गाईड’ अनिवार्य करणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

श्रीकृष्णजन्मभूमीचे प्रकरण संवेदनशील ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

श्रीकृष्णजन्मभूमीचे प्रकरणाला राष्ट्रीय महत्त्व आहे आणि ते संवेदनशील आहे. याचा संपूर्ण देशावर परिणाम होणार आहे.

मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया प्रवासी जलवाहतूक बंद !

मांडवा अलिबाग ते गेटवे ऑफ इंडिया मुंबई ही प्रवासी जलवाहतूक बंद करण्यात आली आहे. ३१ ऑगस्टपर्यंत ही वाहतूक बंद असेल.

पाकिस्तानही हिंदु राष्ट्र बनवण्यात येईल ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

ज्या दिवशी हिंदु कपाळावर टिळा लावून बाहेर पडतील, त्या दिवशी भारतात हिंदु राष्ट्र होईल. भारतालाच नाही, तर पाकिस्तानलाही हिंदु राष्ट्र बनवण्यात येईल.

मी बंगालमध्ये गेलोे, तर मला अटक करण्यात येईल !

बंगालमध्ये लोकशाहीच्या नावाखाली तृणमूल काँग्रेस सरकारकडून हुकूमशाहीच राबवली जात आहे, तेच ही भीती दाखवून देत आहे ! असे सरकार लवकरात लवकर विसर्जित करणेच आवश्यक !

नवी मुंबईत ३० मे या दिवशी पाणीपुरवठा होणार नाही !

मुख्य जलवाहिनीवरील मान्सूनपूर्व पाणीपुरवठ्याच्या संबंधी आवश्यक कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे ३० मे या दिवशी संध्याकाळचा पाणीपुरवठा होणार नसल्याची माहिती अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील यांनी दिली.

मेरठ पालिकेच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या शपथग्रहण सोहळ्याच्या वेळी ‘वन्दे मातरम्’ गाण्यास मुसलमान सदस्यांचा विरोध

केंद्र सरकारने आता ‘वन्दे मातरम्’ला राष्ट्रगीतासमान दर्जा देऊन ते म्हणणे अनिवार्य करण्याचा नियम करावा आणि न म्हणणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून कारागृहात टाकण्याच्या शिक्षेची तरतूद करावी, असेच देशभक्तांना वाटते !

बाली (इंडोनेशिया) येथे जर्मनीच्या महिलेचा नग्न होऊन मंदिरात प्रवेश

एका हिंदु मंदिरामध्ये नग्नावस्थेत प्रवेश करणार्‍या जर्मनीच्या महिला पर्यटकाला अटक करण्यात आली आहे. तिला मानसोपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.