कोल्हापूर जिल्ह्यात गृह मतदानाला प्रारंभ !

गृहमतदान करतांना वयोवृद्ध महिला मतदार

कोल्हापूर – महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला  मतदान होत आहे. तत्पूर्वी ८५ वर्षांवरील वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांना गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सर्व प्रक्रिया म्हणजे एकप्रकारचे मतदान केंद्रच होय. मतदान केंद्रावर ज्याप्रमाणे मतदान पथक रवाना होते, अगदी त्याच प्रमाणे जिल्ह्यातील १० मतदारसंघांतील गृह मतदानाच्या प्रक्रियेस संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आदेशानुसार १४ नोव्हेंबरला सकाळी प्रारंभ करण्यात आला. हे मतदान १६ नोव्हेंबरपर्यंत चालणार असून ४ सहस्र ६०१ गृह मतदान होणार आहे.

गृहमतदान करतांना दिव्यांग मतदार

मतदान केंद्राप्रमाणेच येथेही मतदान प्रक्रिया पूर्णपणे गोपनीय पद्धतीने पार पाडली जात आहे. त्यामुळे मतदानाची गुप्तता कायम रहाते. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतपत्रिका दोन पाकिटात बंदिस्त करून मतपेटीत टाकली जाते.