महाराष्ट्रातही बजरंग दलावर बंदी आणावी ! – माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची हिंदुद्वेषी सूचना

कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही बजरंग  दलावर बंदी घालावी, अशी हिंदुद्वेषी सूचना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली. ते बेळगाव येथे प्रचारासाठी आले असता पत्रकारांशी बोलत होते.

राज्यातील विद्यार्थ्यांना एकाच रंगाचा गणवेश !

प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दिला जाणारा विनामूल्य गणवेश आणि त्याचा रंग हा शाळा व्यवस्थापन समिती, संबंधित संस्था यांच्या स्तरावर ठरवला जात असे; परंतु चालू शैक्षणिक वर्षापासून सरकारच्या वतीने गणवेशाचे कापड दिले जाणार आहे.

राज्यात ८०० हून अधिक अनधिकृत शाळा चालू !

एवढ्या शाळा चालू होईपर्यंत संबंधित अधिकारी झोपले होते का ? त्यांचीही चौकशी करणे आवश्यक आहे.

मणीपूरमध्ये २ समुदायांतील हिंसेत आयकर अधिकार्‍याची हत्या !

मणीपूरमध्ये आदिवासी आणि बिगर आदिवासी समुदायांमध्ये चालू असलेल्या हिंसेत लेमिनथांग हाओकिप नावाच्या एका आयकर अधिकार्‍याची हत्या करण्यात आली.

इंद्रायणीच्या वाढत्या प्रदूषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष !

इंद्रायणीचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाले आहे. दुसरा कोणताही उपाय नसल्यामुळे भाविकांना याच पाण्यात अंघोळ करावी लागते. तसेच इंद्रायणी नदी पवित्र म्हणून अनेक भाविक या नदीचे रसायनयुक्त पाणीही पितांना पहायला मिळतात.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि त्यांचे कुटुंबीय यांची हत्या करण्याचा भाजप नेत्याचा कट !

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या हत्येचा भाजपच्या नेत्याने कट रचला आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी केला आहे.

पाकिस्तानमध्ये खलिस्तानी आतंकवादी परमजीतसिंह पंजवर याची हत्या

खलिस्तान कमांडो फोर्स या खलिस्तानी आतंकवादी संघटनाचा प्रमुख परमजीतसिंह पंजवर याची सनफ्लॉवर सोसायटीमध्ये दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली.

भारतीय पुरातत्व विभागाकडून रायगडाच्या संवर्धनाचे काम संथगतीने चालू !

रायगडाच्या संवर्धनासाठी राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी संमत होऊनही कामात असा वेळकाढूपणा का केला जातो ?

शिर्डी येथे ‘हायप्रोफाईल सेक्स रॅकेट’ उघड

‘हायप्रोफाईल सेक्स रॅकेट’ उघड झाले आहे. पोलिसांनी वेश्याव्यवसाय चालू असलेल्या ६ हॉटेलवर एकाचवेळी धाडी टाकल्या असून १५ पीडित मुलींची सुटका केली आहे

‘द केरळ स्टोरी’ – ‘लव्ह’ ते ‘जिहाद’ या भयावह प्रवासाचे वास्तव जगापुढे आणणारा चित्रपट !

अनेकदा ऐतिहासिक आणि सत्य घटनांवरील चित्रपटांतील दाखले आणि संदर्भ आपणाला ठाऊक असतात. ‘द केरल स्टोरी’ हा असा चित्रपट आहे की, ज्याचे कथानक तर सत्य घटनेवर आधारित आहे; परंतु त्यांच्या भयावहतेपासून भारत आणि जग अनभिज्ञ आहे !