येणार्‍या भक्तांची सर्वतोपरी काळजी घेणारे ब्रह्मोत्सव सोहळ्याचे व्यवस्थापन आणि सनातनच्या साधकांनी घडवलेले स्वयंशिस्तीचे दर्शन !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांचा अमृतमहोत्सव मोठ्या थाटात साजरा केला होता. गुरुदेवांचाही असा भव्य जन्मोत्सव साजरा करावा’, अशी सनातनच्या साधकांची मनोमन इच्छा मागील अनेक वर्षांपासून होती, ती या जन्मोत्सवामुळे पूर्णत्वास गेली !

युद्धावर उपाय शोधण्यासाठी भारत शक्य ते करण्याचा प्रयत्न करील ! – पंतप्रधान मोदी

‘जी ७’ देशांच्या वार्षिक शिखर संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी गेलेले भारताचे पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेंस्की यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चाही करण्यात आली.

भारताने पाडले पाकिस्तानी तस्करांचे २ ड्रोन

सीमेवर भारतीय सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तानी तस्करांनी एकाच रात्री पाठवलेले २ ड्रोन पाडले.

(म्हणे) ‘वादग्रस्त भागात बैठक घेण्यास आमचा विरोध !’

श्रीनगर येथे २२ ते २४ मे कालावधीत तिसरी ‘जी २०’च्या पर्यटन कार्यगटाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला उपस्थित रहाण्यास चीनने नकार दिला आहे.

महाराष्ट्रातील ३२४ गोशाळांना देण्यात येणार ६५ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य !

गोशाळांना साहाय्य करण्यासह गोवंश हत्याबंदी कायद्याची कार्यवाही होत आहे ना, याकडेही शासनाने लक्ष द्यावे !

अकोला दंगलीच्या प्रकरणी अरबाज खान याला अटक !

दंगल प्रकरणात प्रमुख सहभाग असल्याचा आरोप असणार्‍या अरबाज खान याला पोलिसांनी अटक केली. ज्या पोस्टमुळे येथे दंगल झाली, ती पोस्ट अरबाज खान याने इंस्टाग्रामवर प्रसारित केल्याचा पोलिसांना संशय आहे.

जळगाव येथे दंगलखोर धर्मांधांना समजवणार्‍या पोलिसांवर दगडफेक !

उद्दाम धर्मांध ! थेट पोलिसांवरच आक्रमण करणारे धर्मांध हिंदूंवर आक्रमण करण्यास कधी मागे-पुढे पहातील का ? अशांना आजन्म कारागृहात टाकण्याची शिक्षा सरकारने केली पाहिजे, तरच अशा प्रवृत्ती वठणीवर येतील !

खलिस्तानी समर्थक आतंकवादी अमृतपाल सिंह याला ‘एन्.आय.ए.’ ने घेतले कह्यात !

खलिस्तान टायगर फोर्सशी संबंधित असलेल्या आतंकवादी अमृतपाल सिंह याला नुकतेच फिलिपाइन्समधून भारतात आणण्यात आले. अमृतपाल सिंह देहली विमानतळावर येताच राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) त्याला अटक केली.

कुनो नॅशनल पार्कमधील चित्ते दुसरीकडे हालवावेत !  – सर्वोच्च न्यायालय

मध्यप्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये आफ्रिकेतून आणण्यात आलेल्या चित्त्यांपैकी ३ चित्त्यांचा गेल्या २ मासांत मृत्यू झाला आहे. यावरून सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त करत उर्वरित चित्यांना दुसर्‍या उद्यानात हलवण्याचा विचार करावा, असे वन्यजीव तज्ञ समितीला सांगितले आहे.

पुणे येथे कारवाईसाठी गेलेल्या अतिक्रमण विभागाच्या साहाय्यक निरीक्षकास मारहाण !

तक्रारदार प्रशांत कोळेकर हे महापालिकेत साहाय्यक अतिक्रमण निरीक्षक आहेत. ते ए.आय.एस्.एस्.एम्.एस्. कॉलेजजवळ कैलास स्मशानभूमीकडे जाणार्या रस्त्यावर अतिक्रमण काढण्याची कारवाई करत होते. त्या वेळी ही कारवाई न करण्यासाठी आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली,