यासाठी तरी देवाचे भक्त व्हा !

‘तिसर्‍या महायुद्धातील भीषण काळात केवळ देवच वाचवू शकेल; म्हणून तरी देवाचे भक्त व्हा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

नगर जिल्‍ह्यात सातवाहन ते मध्‍ययुगीन वसाहतींचे पुरावे उत्‍खननात सापडले !

उत्‍खननाचे हे कार्य मे मासाच्‍या दुसर्‍या आठवड्यापर्यंत चालणार आहे. उत्‍खननात सातवाहन काळातील बाजारपेठ आणि त्‍या गावात रहाणार्‍या लोकांचे रहाणीमान दर्शवणारे पुरावे सापडत आहेत.

डाळींची साठेबाजी रोखण्‍यासाठी मिल-गोदामांनी प्रशासनास सहकार्य करावे ! – मिलिंद शंभरकर, जिल्‍हाधिकारी, सोलापूर

या वेळी शंभरकर म्‍हणाले, ‘‘पडताळणीसाठी आलेल्‍या पथकांना आवक-जावक रजिस्‍टर आणि अन्‍य सर्व कागदपत्रे उपलब्‍ध करून द्यावीत. संकेतस्‍थळावर सत्‍य माहिती भरावी.’’

मुंबई-पुणे महामार्गावर ४० सहस्र ९०९ वाहनांवर कारवाई !

आतापर्यंतच्‍या सर्वपक्षीय शासनकर्त्‍यांनी जनतेला शिस्‍त न लावल्‍याचा परिणाम !

महाराष्‍ट्रात वैदिकपूर्व काळातील शिवलिंग आढळले !

याच चित्रगुहेतील दगडावर कालभैरवाचे नृत्‍य करतांनाचे चित्रही रेखाटले आहे. तसेच जवळील एका शैलगृहात पांढर्‍या रंगातील ‘ॐ’ ची आकृती आहे.

नाशिक शहरातील अन्‍नभेसळ रोखण्‍यासाठी केवळ ५ अधिकारी; नागरिकांच्‍या जिवाशी खेळ !

अहवाल मिळण्‍यात केवळ प्रयोगशाळांच्‍या संख्‍यांची अडचण आहे कि अन्‍यही काही आर्थिक लागेबांधे आहेत, याचा शोध घेतला गेला पाहिजे !

चोरे (सातारा) येथील वन विभागाच्‍या सीमेत गौण खनिजाचे उत्‍खनन !

कराड तालुक्‍याच्‍या वनसीमेत अनधिकृतपणे गौण खनिजाचे उत्‍खनन करणार्‍या दोघांवर वन विभागाने कारवाई केली आहे. यामध्‍ये पोकलेन मशीन आणि डंपरसह वन विभागाने लाखो रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेतला आहे.

न मे भक्‍तः प्रणश्‍यति !

जळगाव जिल्‍ह्यासह राज्‍यात अवेळी पावसाने हाहाकार माजवला आहे. अवेळी पावसासह वादळी वारे आणि गारपीट यांमुळे शेतकर्‍यांची मोठी हानी झाली आहे.

जिल्‍ह्याचे प्रमुख ठिकाण असलेल्‍या कोल्‍हापूर जिल्‍हाधिकारी कार्यालयात उपस्‍थिती नोंदवण्‍यासाठी ‘बायोमेट्रिक’ व्‍यवस्‍थाच नाही !

कोल्‍हापूर जिल्‍ह्याच्‍या तुलनेत सांगली महापालिकेसारख्‍या तुलतेन अत्‍यंत लहान असलेल्‍या महापालिकेत ‘बायोमेट्रिक’ व्‍यवस्‍था आहे, इतकेच नाही, तर प्रत्‍येक वेळी कार्यालयातून आत-बाहेर जातांना ‘फेस रिडींग’द्वारे यंत्रावर नोंद करावी लागते.