राज्यात बेपत्ता मुलींचे स्वतंत्र समितीकडून अन्वेषण होणार !

स्वतंत्र समिती सिद्ध करून समितीच्या माध्यमातून अन्वेषण करण्याच्या दृष्टीने तातडीने कारवाई करण्यासाठी राज्य महिला आयोगाने गृह सचिवांना त्यांच्या कार्यालयात १५ मे या दिवशी उपस्थित रहाण्याच्या सूचना केल्या आहेत.

विज्ञापनाद्वारे स्वतःची प्रतिमा मलीन केल्याचा आरोप !

भारताचे प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी त्यांची प्रतिमा मलीन केल्याविषयी मुंबई पोलिसांकडे अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार प्रविष्ट केली आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस येथे प्रवाशाचा भ्रमणभाष चोरणार्या धर्मांधाला अटक !

लोकमान्य टिळक टर्मिनस येथील तिकीट आरक्षण कार्यालयाजवळ झोपलेल्या एका प्रवाशाचा भ्रमणभाष चोरणार्‍या मतीन अन्सारी (वय २२ वर्षे) या आरोपीला आर्.पी.एफ्.च्या जवानांनी रंगेहात पकडले.

नाशिक येथे ७० रुग्णालये विनानोंदणी; महापालिकेकडून नोटिसांचा बडगा !

प्रामुख्याने परिचारिकांची नोंदणी प्रमाणपत्र, प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दाखला आदी कारणास्तव नोंदणीमध्ये बाधा येत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

मुंबई शहरात १७ ठिकाणी ‘हिरकणी कक्ष’ उभारणार !

सार्वजनिक ठिकाणी तान्ह्या बाळाला दूध पाजतांना महिलांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी राज्याच्या महिला आणि बाल कल्याण विकास विभागाने मुंबई शहरात १७ ठिकाणी ‘हिरकणी कक्षा’ची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

जळगाव जिल्ह्यात उष्माघातामुळे महिलेचा मृत्यू !

येथे सध्या उष्णतेची लाट पसरली असून तापमान ४५ अंश सेल्सियस इतके झाले आहे. अमळनेर येथील रूपाली राजपूत यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड !

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सातारा दौरा नियोजित होता; पण त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला. त्यामुळे त्यांचा दौरा अचानक रहित करण्यात आला आहे.

लिंग परिवर्तनाचे उदात्तीकरण करणार्‍या ‘स्टारबक्स’ आस्थापनाच्या विरोधात हिंदूंचा संताप !

अमेरिकी आस्थापन असलेल्या ‘स्टारबक्स’चा भारतातील व्यवसाय हा ‘टाटा’ उद्योगसमुहाच्या भागीदारीत चालू आहे. त्यामुळे आता ‘टाटा’ने त्यांना खडसावून विज्ञापन मागे घेण्यास भाग पाडले पाहिजे !

बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीला एकही जागा नाही : निपाणीत भाजपच्या शशिकला जोल्ले विजयी !

मराठी माणसांवर होणार्‍या अन्यायाच्या सूत्रावर लढा देणार्‍या महाराष्ट्र एकीकरण समितीला बेळगाव जिल्ह्यात एकही जागा नाही ! बेळगाव जिल्ह्यात १८ पैकी ११ मतदारसंघामध्ये काँग्रेसने विजय मिळवला आहे.

मुसलमानांच्या भीतीने दुर्गाडी गडावर महाराष्ट्र दिन साजरा करण्यास अनुमती नाकारली !

असे पोलीस काम कुणासाठी करतात, महाराष्ट्र शासनासाठी कि अतिक्रमण करणार्‍यांसाठी ?