आजची पत्रकारिता मूळ उद्देशापासून भरकटत चालली आहे ! – सुशील कुलकर्णी

आज अनेक वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या बंद पडत आहेत. विविध माध्यमांची घसरण चालू असतांना समाजमाध्यमे मात्र वाढत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांना अपेक्षित ‘कि घेतले न हे व्रत अंधतेने’ या उक्तीप्रमाणे पत्रकारिता होतांना दिसत नाही.

देशभक्त असल्याची शिक्षा मिळत आहे !

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एन्.सी.बी.) माजी विभागीय संचालक समीर वानखडे यांच्याशी संबंधित २९ ठिकाणांवर धाड टाकली आहे.

राज्यातील ९०९ गावे आणि वाड्या येथे २१३ टँकरद्वारे पाणीपुरवठा !

ज्यातील अनेक भागांत आता पाणीटंचाई जाणवू लागली आहे. मे मासात लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त भागात शासनाकडून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त पुणे येथे कार्यक्रम !

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या तिथीनुसार असणार्या जयंतीनिमित्ताने येथील अंबर हॉल, कर्वे रोड येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी मंडळाच्या वतीने १३ मे या दिवशी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

वीजदेयकांसाठी छापील कागदांचा वापर बंद करत पुणेकरांनी केली कोट्यवधींची बचत !

‘महावितरण’च्या ‘गो-ग्रीन’ योजनेच्या अंतर्गत पुणे परिमंडलाने राज्यात आघाडी घेतली असून या योजनेमुळे १ लाख ७ वीजग्राहकांची १ कोटी २० लाख ८४० रुपयांची वार्षिक बचत होत आहे. राज्यात ३ लाख ८७ सहस्र ७५७ वीजग्राहकांनी ‘गो-ग्रीन’ योजनेत सहभाग घेतला आहे.

न्हावा शेवा बंदरात २४ कोटींच्या परदेशी सिगारेट पकडल्या !

न्हावा शेवा बंदरातून २४ कोटींच्या परदेशी सिगारेट जप्त करण्यात आल्या असून ५ जणांना महसूल गुप्त वार्ता संचालनालयाच्या (डी.आर्.आय.च्या) अधिकार्‍यांनी अटक केली आहे.

अंमलबजावणी संचालनालयाकडून जयंत पाटील यांना दुसर्‍यांदा समन्स !

पाटील यांना २२ मे या दिवशी चौकशीसाठी कार्यालयात उपस्थित रहाण्याचा आदेश अंमलबजावणी संचालनालयाकडून देण्यात आला आहे.

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर तातडीने मुंबईत उपस्थित !

विधानसभेचे अध्यक्ष परदेशात असल्यामुळे आमदारांच्या पात्र-अपात्रतेचा निर्णय घ्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरि झिरवाळ यांच्याकडे केली आहे.

पुणे येथे अनधिकृत शाळा पाडण्याच्या आदेशाची कारवाई !

न्यायालयाने महापालिकेच्या विरोधातील याचिका फेटाळून लावत शाळेच्या ४ ही इमारती पाडण्याचे आदेश दिले होते, अशी माहिती पुणे महापालिकेच्या विधी विभागप्रमुख, विधी सल्लागार निशा चव्हाण यांनी दिली.