(म्हणे) ‘केरळमधील ३२ सहस्र महिलांनी इस्लाम स्वीकारल्याचा पुरावा द्या आणि १ कोटी रुपये मिळवा !’ – काँग्रेसचे नेते शशी थरूर

आगामी चित्रपट ‘द केरल स्टोरी’वरून काँग्रेसचे नेते शशी थरूर यांचे हास्यास्पद आव्हान !

काँग्रेसचे नेते शशी थरूर

मुंबई – ‘केरळमधील ३२ सहस्र महिलांनी इस्लाम स्वीकारला’, हा दावा सिद्ध करण्यासाठी पुरावे सादर करा आणि एक कोटी रुपये घ्या, असे उघड आव्हान काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी दिले आहे. एका ट्वीटद्वारे केलेल्या या आवाहनात त्यांनी ‘नॉट अ केरला स्टोरी’ हा हॅशटॅग वापरला आहे. ‘ज्यांना आव्हान स्वीकारून १ कोटी रुपयांचे बक्षीस मिळवायचे आहे, ते ४ मे या दिवशी केरळमधील कोणत्याही जिल्ह्यातून पुरावे सादर करू शकतात’, असेही थरूर म्हणाले.

‘द केरला स्टोरी’ या ५ मे या दिवशी प्रसारित होणार्‍या चित्रपटाच्या ट्रेलरवरून (चित्रपटातील काही भागावरून) सध्या रणकंदन माजले आहे. ‘केरळमधील ३२ सहस्र हिंदु आणि ख्रिस्ती मुलींना इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी होण्यासाठी बळजोरीने धर्मांतर करून देशाबाहेर पाठवण्यात आले’, या वास्तवाचे चित्रण करणार्‍या या चित्रपटाला राज्यातील साम्यवादी सरकारसमवेतच काँग्रेसनेही विरोध दर्शवला आहे. थरूर यांनी पुढे म्हटले आहे की, ही तुमच्या (भाजप आणि रा.स्व. संघ यांची) केरळची गोष्ट असू शकते. ही आमच्या केरळची गोष्ट नाही.

संपादकीय भूमिका

  • ‘थरूर यांनी ३२ सहस्र मुसलमानेतर महिलांचे धर्मांतर झाले नाही’, हे सिद्ध करून दाखवल्यास त्यांना १० कोटी रुपये दिले जातील अन्यथा त्यांनी राजकीय संन्यास घ्यावा’, असे कुणी आव्हान दिल्यास थरूर ते स्वीकारण्यास सिद्ध आहेत का, हे त्यांनी आधी सांगावे !
  • काश्मीरमधील लक्षावधी काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदावर चकार शब्दही न बोलणार्‍या थरूर यांची हीच का धर्मनिरपेक्षता ?
  • काँग्रेसचे उभे आयुष्य हे मुसलमानांचे लांगूलचालन करण्यात गेले. यामुळेच ती आता राजकीयदृष्ट्या नामशेष होण्याच्या मार्गावर असतांना तिने घेतलेली ही भूमिका ही ‘विनाशकाले विपरीतबुद्धी ।’चेच उदाहरण होय !