हिंदुत्वाच्या रक्षणासाठी तुम्हा सर्वांना दायित्व घ्यावे लागेल ! – मंगलप्रभात लोढा
१०० वर्षांपूर्वी समाजातील दलित बंधूंना मान कसा मिळावा ? याकरता भागोजीशेठ कीर यांनी पतित पावन मंदिर उभारले. याच मंदिरात वीर सावरकर यांनी सहभोजन चालू केले. वीर सावरकर यांनी ‘स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारतमातेला परकीय शक्तींपासून मुक्त करीन’, अशी शपथ घेतली; कारण त्याविना भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना होणार नाही, हे त्यांना ठाऊक होते.