संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याला वादाची किनार उगाचच लागली ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

देशाचे नवीन संसद भवन हे देशातील लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. नवीन वास्तूमध्ये लोकशाहीचे औचित्य आणि गांभीर्य टिकून राहू दे. या वास्तूच्या उद्घाटन सोहळ्याला वादाची किनार उगाचच लागली.

महेंद्र पंडित कोल्हापूरचे नवे पोलीस अधीक्षक !

कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांचे पुणे येथे राज्य राखीव पोलीस बलाचे समादेशक म्हणून स्थानांतर झाले आहे.

पुण्यात ६२२ सरकारी कर्मचार्‍यांवर शिरस्त्राण परिधान न केल्याने आर्.टी.ओ.ची कारवाई !

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुणे शहर वाहतूक पोलीस अन् आर्.टी.ओ. (प्रादेशिक परिवहन कार्यालय) प्रशासनाला शहरातील सरकारी कार्यालयात शिरस्त्राण परिधान न करणार्‍या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

पुण्यात ‘तिहेरी तलाक’ प्रकरणी अकीबला अटक आणि जामीन !

विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करून ‘तिहेरी तलाक’ (घटस्फोट) दिल्या प्रकरणी अकीब मुल्ला याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला २ दिवसांची पोलीस कोठडी नंतर जामीन संमत केला आहे. या प्रकरणी २३ वर्षीय विवाहितेने तक्रार प्रविष्ट केली आहे.

#Exclusive : स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी साम्यवाद्यांचा स्वातंत्र्यवीर सावरकरांना विरोध ! – अनुपम मिश्रा, संपादक, दैनिक ‘प्रयागराज टाईम्स’, उत्तरप्रदेश

साम्यवाद्यांच्या ‘देशाला तोडा आणि राज्य करा’ या नीतीला सावरकर यांच्या प्रखर देशभक्तीमुळे धोका निर्माण झाला. येथूनच साम्यवादी विचारसरणीच्या लोकांनी सावरकर यांना विरोध चालू केला; कारण प्रश्‍न त्यांच्या राजकीय अस्तित्वाचा होता.

नाशिक येथील सप्तशृंगी देवीच्या मंदिरातही वस्त्रसंहिता लागू होणार !

सप्तशृंगी गडावरील श्री सप्तशृंगी देवीच्या मंदिरातही पावित्र्य जपण्यासाठी भाविकांना वस्त्रसंहिता लागू करण्यात येणार आहे.

#Exclusive : स्वा. सावरकरांनी  हिंदूंच्या दृष्टीकोनातून लिहिलेला इतिहास अभ्यासणे आवश्यक ! – डॉ. एस्.आर्. लीला, संस्कृतच्या निवृत्त प्राध्यापिका

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदूंच्या दृष्टीकोनातून लिहिलेला इतिहास वाचल्याविना गतवैभव समजणार नाही आणि जोपर्यंत तुम्ही इतिहास समजून घेत नाही, तोपर्यंत तुम्हाला वर्तमानही समजणार नाही.

संभल (उत्तरप्रदेश) येथे अल्पवयीन हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार करणार्‍या धर्मांध तरुणांना अटक

अशा धर्मांधांना शरीयत कायद्यानुसार भूमीमध्ये कमरेपर्यंत गाडून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची मागणी कुणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

राष्ट्रीय जनता दलाने शवपेटीशी केली नवीन संसद भवनाची तुलना !

विरोधाला विरोध करण्यासाठी नकारात्मकतेचे टोक गाठणारा राजद पक्ष ! अशांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच !

धरणात पडलेला स्वतःचा भ्रमणभाष संच शोधण्यासाठी लाखो लिटर पाणी उपसणारा अन्न निरीक्षक निलंबित !

अशांना निलंबित नाही, तर अटक करून अनेक दिवस पाण्याविना रहाण्याचीच शिक्षा केली पाहिजे !