अजित पवार वगळता सर्व नेत्यांकडून निर्णयाला भावनात्मक वळण देण्याचा प्रयत्न !
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी २ एप्रिल या दिवशी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या पदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. ‘लोक माझे सांगाती’ या शरद पवार यांच्या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमधील प्रकाशन सोहळ्यामध्ये भाषण करतांना शरद पवार यांनी ही निवृत्तीची घोषणा केली.
अध्यक्षपदासाठी नवीन व्यक्तीची नियुक्ती करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. या वेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी शरद पवार यांनी पदाचे त्यागपत्र मागे घेण्याची गळ घातली; मात्र या वेळी अजित पवार यांनी मात्र भावनात्मक न होता शरद पवार यांच्या त्यागपत्राच्या भूमिकेचे समर्थन केले.