कल्याण रेल्वेस्थानक परिसरातून १७ भिकारी, १४ गर्दुल्ले यांना अटक

कल्याण रेल्वेस्थानकातून प्रवास करणार्‍या प्रवाशांना गर्दुल्ल्यांनी लुटले, तसेच महिलांची छेड काढलील, अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यांची नोंद घेत २३ मेच्या रात्री १७ भिकारी, १४ गर्दुल्ले अशा ३१ जणांना लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी कारवाई करून रेल्वेस्थानक भागातून अटक केली आहे.

पन्हाळा गडावरील (जिल्हा कोल्हापूर) मजारीची अज्ञातांकडून नासधूस !

कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक पन्हाळा गडावर असलेल्या तानपीर मजारीची २५ मे या दिवशी पहाटे अज्ञातांनी नासधूस केली. नासधूस केल्यानंतर काही काळ पन्हाळा बंद ठेवण्यात आले होते.

छत्रपती संभाजीनगर येथे ४ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणी कामगार नेत्याला अटक !

येथील उद्योजकांकडे काही विशिष्ट नेत्यांकडून खंडणी मागितली जात आहे, अशी तक्रार उद्योजकांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती; मात्र ग्रामीण पोलिसांनी प्रत्यक्षात अशा तथाकथित नेत्यांच्या विरोधात कारवाईला प्रारंभ केला असून पैठण औद्योगिक वसाहतमधील उद्योजकाकडे ४ कोटी रुपयांची खंडणी मागणार्‍या एका कामगार नेत्याला अटक..

नव्या संसदेच्या उद्घाटनावरून सर्वोच्च न्यायालयात याचिका !

संसदेच्या नव्या इमारतीचे २८ मे या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत असले, तरी ते राष्ट्रपतींच्या हस्ते होणे आवश्यक असल्याची भूमिका देशभरातील विरोधी पक्षांनी घेतली आहे.

गुजरातमध्ये गोमांसयुक्त सामोशांची विक्री करणार्‍या इस्माईल युसूफला याला अटक !

अशा धर्मांध मुसलमानांच्या दुकानांमधून हिंदूंनी खाद्यपदार्थ विकत घ्यायचे बंद केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

महाराष्ट्राचा इयत्ता १२ वीचा निकाल ९१.२५ टक्के, कोकणाचा निकाल सर्वाधिक !

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यामिक शिक्षण मंडळाच्या वर्ष २०२२-२३ च्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेचा निकाल २५ मे या दिवशी घोषित करण्यात आला.

#Exclusive : भारतीय अर्थव्यवस्थेला सशक्त करण्यासाठी स्वदेशीचा अवलंब करावा लागेल ! – रोहित चक्रतीर्थ, कर्नाटक

आपली अर्थव्यवस्था सक्षम करणे आणि स्वदेशीचा अवलंब करून देश बळकट करणे या गोष्टी सद्यःस्थितीत आपण सावरकरांकडून शिकायला हव्या. हाच संदेश सावरकरांनी विदेशी कपड्यांची होळी करतांना दिला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पुरवणी आरोपपत्र प्रविष्ट

अनंत करमुसे यांच्यावर आक्रमण केल्याच्या प्रकरणाी राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात ठाणे पोलिसांनी पुरवणी आरोपपत्र ठाणे न्यायालयात प्रविष्ट केले.

ओडिशातील शिवमंदिरांत गांजा अर्पण करणे आणि त्याचा प्रसाद वाटणे यांवर बंदी ! – ओडिशा सरकारचा निर्णय

हिंदूंच्या मंदिरांमध्ये काय असावे आणि काय नसावे, याविषयी निर्णय घेण्याचा अधिकार सरकारांना नाही, तर धर्मचार्यांनाच असला पाहिजे !

‘पर्यावरणपूरक’ असा खोटा प्रचार करून प्रदूषणकारी कागदी लगद्यांच्या गणेशमूर्तींची केली जाते विक्री !

कागदी लगद्यापासून बनवण्यात येणार्‍या श्री गणेशमूर्तींवर बंदी असतांनाही त्याची उघडपणे राज्यात विक्री होते, हे प्रशासनाला लज्जास्पद !