‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत गांधी मैदानात भव्य सभा ! – राजेश क्षीरसागर

राज्यशासनाने शासनाच्या विविध योजनांचा लाभ जनतेला व्हावा यासाठी ‘जत्रा शासकीय योजनांची, सर्वसामान्यांच्या विकासाची’, हा उपक्रम चालू केला आहे. या अंतर्गत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्यावर येत असून २८ मे या दिवशी महात्मा गांधी मैदानात सायंकाळी ५ वाजता भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी दिली.

धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली होणार्या प्रकारांचे ‘विशेष पथका’द्वारे अन्वेषण करा ! – कुंदन पाटील, विश्व हिंदु परिषद

१७ मे या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यात आजरा येथील मदरशात जाणार्या ६९ अल्पवयीन मुलांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे.

केक कापून श्री शनिदेवाचा वाढदिवस साजरा करण्याची अशास्त्रीय पाश्चात्य प्रथा बंद करा !

धर्मशास्त्र आणि हिंदु संस्कृती यांना धरून नसलेल्या या पाश्चात्त्य प्रथेला देवस्थानने प्रतिबंध करावा, अशी मागणी १८ मे या दिवशी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या वतीने करण्यात आली आहे.

निर्माते विपुल शाह यांनी धर्मांतराला बळी पडलेल्या २६ पीडित मुलींना समाजासमोर आणले !

ज्या महिला खरोखर धर्मांतराला बळी पडल्या आहेत, अशांपैकी २६ पीडित मुलींची आम्ही आज ओळख करून देत आहोत. ही केवळ केरळची गोष्ट नाही, तर संपूर्ण भारतात असे चालू आहे. चित्रपटात ३ मुलींच्या माध्यमातून सहस्रो मुलींची कथा आम्ही समोर आणली आहे, असे प्रतिपादन ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाचे निर्माते विपुल शाह यांनी केले.

२६/११ आक्रमणातील आरोपी तहव्वूर राणाच्या भारतात प्रत्यार्पणास अमेरिकेची स्वीकृती !

मुबंईत २६ नोव्हेंबर २००८ (२६/११) मध्ये झालेल्या मुंबईवरील आतंकवादी आक्रमणात सहभागी असलेला पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन व्यावसायिक तहव्वूर राणा याला भारतात प्रत्यार्पित करण्यास अमेरिकेतील न्यायालयाने होकार दिला आहे.

बांगलादेशने भारतीय प्रशासकीय अधिकार्‍यांची अतिरिक्त सुरक्षा काढली !

हिंदूंच्या रक्षणाचे दायित्वही स्वीकाराचे नाही आणि त्यांना संरक्षणही पुरवायचे नाही, हे बांगलादेशचे धोरण हिंदुविरोधी आहे !

सातारा शहरातील पश्चिम भागात किडे आणि अळ्यामिश्रित पाणीपुरवठा !

शहराच्या पश्चिम भागात गत ३ मासांपासून कधी गाळमिश्रित, तर कधी किडे, अळ्यामिश्रित पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून नागरिक प्रचंड संताप व्यक्त करत आहेत.

बद्रीनाथ आणि केदारनाथ यांना इस्लामी स्थान म्हणणार्‍या तथाकथित साधूच्या विरोधात गुन्हा नोंद !

अशांना आजन्म कारागृहात टाका !

सरकारी भूमींवरील अवैध धार्मिक बांधकामे पाडलीच पाहिजेत ! – उत्तराखंड उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

सरकारी भूमीवर अतिक्रमण होण्यास उत्तरदायी असणार्‍या दोषी सरकारी अधिकार्‍यांवरही कठोर कारवाई झाली पाहिजे !

सनातन धर्माच्या रक्षणासाठी ‘माला’ (जपमाळ) आणि ‘भाला’ दोघांची आवश्यकता ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

सनातन धर्मामध्ये शास्त्र आणि शस्त्र या दोघांची आवश्यकता आहे. शास्त्र आणि शस्त्र यांच्यात अधिक अंतर नाही.