आमचे कुटुंब हे हुतात्म्याचे कुटुंब म्हणून ओळखले जाईले ! – हुतात्मा सैनिकाचे नातेवाईक

नक्षलवाद्यांच्या आक्रमणात १० सैनिक वीरगतीला प्राप्त झाले. धारातीर्थी पडलेल्या १० पैकी ८ सैनिक हे पूर्वाश्रमीचे नक्षलवादीच होते; परंतु शरणागती पत्करून ते मुख्य प्रवाहात सहभागी झाले.

‘काँग्रेसला मत देणार नाही’, असे म्हणणार्‍या तरुणाला काँग्रेसच्या नेत्याकडून मारहाण !

हिंदूंचे नेते आणि संघटना यांना ‘आतंकवादी’ म्हणणारी काँग्रेस स्वतःच आतंकवादी आहे’, असे म्हणायचे का?  

बृजभूषण शरण सिंह यांच्यावर गुन्हा नोंदवू !

जोपर्यंत बृजभूषण शरर सिंह यांना पदावरून हटवण्यात येत नाही, त्यांना कारागृहात टाकले जात नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच राहील. ही लढाई केवळ गुन्हा नोंदवण्यापुरती नाही. अशा लोकांपासून खेळाला वाचवले पाहिजे.

(म्हणे) ‘भारतात जाऊन त्याच्याशी युद्ध करण्याची पाकच्या सैन्याची क्षमता !’ – पाकचे मेजर जनरल अहमद शरीफ

अशा धमक्या देणार्‍या पाकला समजेल अशा भाषेत भारताने प्रत्युत्तर देणे आवश्यक !

रशियाने युक्रेनी शहरांवर केलेल्या हवाई आक्रमणांत १३ लोक ठार !

युक्रेनी सैन्याला पाश्‍चिमात्य मित्रराष्ट्रांकडून नवे युद्ध साहित्य मिळाल्यानंतर ‘आम्ही रशियावर आक्रमण करणार’, असा सुतोवाच वोलोदिमिर झेलेंस्की यांनी केला होता. त्यानंतर रशियाने ही आक्रमणे केली.

पालघर साधू हत्याकांडाचे अन्वेषण सीबीआयकडे !

कल्पवृक्ष गिरी उपाख्य चिकणे महाराज आणि सुशील गिरी महाराज हे २ साधू, तसेच वाहनचालक नीलेश तेलगडे हे जमावाच्या आक्रमणाला बळी पडले होते. साधूंच्या हत्याकांडानंतर देशातील संत संतप्त झाले होते.

पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिर सरकारमुक्त करण्यासाठी डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांच्या याचिकेवरील सुनावणीस प्रारंभ !

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर कह्यात घेण्याच्या संतापाविषयी महाराष्ट्रातील सर्व मंत्र्यांना बडतर्फ करा, असे कार्यकर्त्यांनी पक्षनेतृत्वाला सांगावे.

बारामती (पुणे) येथे प.पू. कालीचरण महाराज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद

‘मोर्च्याच्या समारोपप्रसंगी प.पू. कालीचरण महाराज यांनी धार्मिक तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य करत अफवा पसवण्याचा प्रयत्न केला’, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी स्वतः तक्रार प्रविष्ट करून ही कारवाई केली आहे.

बारसू येथील प्रकल्पाला ७०  टक्क्यांहून अधिक लोकांचे समर्थन ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

आंदोलन करणारे काही लोक स्थानिक, तर काही बाहेरचे होते. कोणत्याही परिस्थितीत प्रकल्पाच्या कामासाठी बळजोरी केली जाणार नाही. प्रकल्पामुळे नागरिकांना रोजगार मिळेल.

(म्हणे) ‘द केरल स्टोरी’ चित्रपटावर बंदी घाला !’- काँग्रेसची मागणी

ज्या वेळी धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले आक्रमण दाखवण्याचा प्रयत्न झाला, त्या वेळी काँग्रेसने त्याला विरोध केला आहे आणि आताही ती तेच करत आहे ! काँग्रेस म्हणजे दुसरी मुस्लिम लीग आहे, हेच लक्षात येते !