बारामती (पुणे) येथे प.पू. कालीचरण महाराज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद

प.पू. कालीचरण महाराज

बारामती (जिल्हा पुणे) – येथे ९ फेब्रुवारी या दिवशी आयोजित हिंदु गर्जना मोर्चात कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या प्रकरणी प.पू. कालीचरण महाराज आणि आयोजक विकास देवकाते यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलीस कर्मचारी अतुल जाधव यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे. ‘मोर्च्याच्या समारोपप्रसंगी प.पू. कालीचरण महाराज यांनी धार्मिक तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य करत अफवा पसवण्याचा प्रयत्न केला’, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी स्वतः तक्रार प्रविष्ट करून ही कारवाई केली आहे.