‘काँग्रेसला मत देणार नाही’, असे म्हणणार्‍या तरुणाला काँग्रेसच्या नेत्याकडून मारहाण !

काँग्रेसला मत न दिल्यास मारून टाकण्याची नेत्याची धमकी !

तुमकुरू (कर्नाटक) – विजयपूर येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या काँग्रेसच्या प्रचारसभेत एका युवकाने काँग्रेसचे नेते एम्.बी. पाटील यांना ‘आमच्या गावात विकासाची कामे झालेली नाहीत’, याविषयी जाब विचारल्यावर पाटील यांनी त्या तरुणाच्या थोबाडीत मारल्याचा व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाला होता. आता अशीच घटना तुमकुरू जिल्ह्यातील ज्योतीनगर येथे घडली आहे. ज्योतीनगर येथे जितेंद्र नावाच्या तरुणाने ‘लोकशाहीत मतदार त्याला आवडलेल्या पक्षाला मत देऊ शकतो. तो त्याचा अधिकार आहे. काँग्रेसला मत देणार नाही’, असे विधान केले. त्यामुळे काँग्रेसचे नेते गोणिहळ्ळी देवराजू आणि त्यांचे ३ सहकारी यांनी जितेंद्र यांच्यावर आक्रमण केले. देवराजू यांनी ‘तू  काँग्रेसला मत दिले नाहीस, तर तू जगणार नाहीस, तुला मारून टाकीन’, अशी धमकी देऊन त्याला मारहाण केली. या मारहाणीत जितेंद्र यांचे दात तुटले. या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

  • ‘काँग्रेस म्हणजे गुंडांची टोळी’, असे कुणी म्हटल्यास आश्‍चर्य वाटू नये !
  • ‘हिंदूंचे नेते आणि संघटना यांना ‘आतंकवादी’ म्हणणारी काँग्रेस स्वतःच आतंकवादी आहे’, असे म्हणायचे का?