(म्हणे) ‘द केरल स्टोरी’ चित्रपटावर बंदी घाला !’- काँग्रेसची मागणी

राज्याची प्रतिमा अपकीर्त करण्याचा प्रयत्न होत असल्याचा फुकाचा दावा !

“The Kerala Story”

थिरूवनंतपूरम् (केरळ) – काँग्रेसने ‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. काँग्रेसचे म्हणणे आहे, ‘या चित्रपटात करण्यात आलेले दावे चुकीचे आहेत. या दाव्यांमुळे समाजातील धार्मिक सौहार्द बिघडू शकते.’ या चित्रपटामध्ये दक्षिण भारतातील ३२ सहस्र हिंदु आणि ख्रिस्ती तरुणी बेपत्ता झाल्याच्या वास्तविक घटनांची माहिती देण्यात आली आहे. या तरुणींना ‘लव्ह जिहाद’द्वारे फसवण्यात आले आणि त्यांतील काही जणींना मध्य-पूर्वेतील देशात नेऊन आतंकवादी संघटना इस्लामिक स्टेटमध्ये भरती करण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे. ५ मे या दिवशी हा चित्रपट देशात प्रदर्शित होणार आहे.

काँग्रेसचे नेते आणि केरळ विधानसभेतील विरोधी पक्षेनेते व्ही.डी. सतिशन् यांनी म्हटले की,

काँग्रेसचे नेते आणि केरळ विधानसभेतील विरोधी पक्षेनेते व्ही.डी. सतिशन्

१. या चित्रपटाचा उद्देश राज्यातील आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा अपकीर्त करण्याची आहे. ‘३२ सहस्र तरुणींचे धर्मांतर करून त्यांना मुसलमान बनवून इस्लामिक स्टेटमध्ये भरती करण्यात आले’, अशी खोटी माहिती देणार्‍या या चित्रपटाला प्रदर्शित करण्याची अनुमती देण्यात येऊ नये.

२. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये (चित्रपटाच्या विज्ञापनामध्ये) दाखवण्यात आले आहे की, या चित्रपटात काय आहे. हे अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे सूत्र नाही, तर अल्पसंख्यांकांना एकटे पाडण्याचे रा.स्व. संघाचे धोरण लागू करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. त्यामुळे राज्याने संघटित होऊन उभे राहिले पाहिजे.

संपादकीय भूमिका

  • ज्या वेळी धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले आक्रमण दाखवण्याचा प्रयत्न झाला, त्या वेळी काँग्रेसने त्याला विरोध केला आहे आणि आताही ती तेच करत आहे ! काँग्रेस म्हणजे दुसरी मुस्लिम लीग आहे, हेच लक्षात येते !
  • सत्य घटना दाखवणार्‍या चित्रपटाचा विरोध करणारी काँग्रेस सत्यप्रेमी नाही, तर असत्यप्रेमी आहे, हे लक्षात घ्या !