पाकचे मेजर जनरल अहमद शरीफ यांची पोकळ धमकी !
पाकचे माजी सैन्यदलप्रमुख कमर बाजवा यांनी पाककडे लढण्याची शक्ती नसल्याच्या केलेल्या विधानावर शरीफ यांनी व्यक्त केली प्रतिक्रिया !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानचे मेजर जनरल अहमद शरीफ यांनी भारताच्या भूमीवर जाऊन त्याच्याशी युद्ध करण्याची पाकच्या सैन्याकडे क्षमता असल्याची धमकी दिली आहे. पाकिस्तानचे ज्येष्ठ पत्रकार हमीद मीर यांनी माजी सैन्यदलप्रमुख कमर बाजवा यांच्या हवाल्याने सांगितले होते, ‘पाककडे भारताशी युद्ध करण्यासाठी दारूगोळा आणि पैसे नाहीत.’ त्यावर मेजर जनरल अहमद शरीफ यांनी ही धमकी दिली आहे. तसेच पाक सैन्याने त्याच्याकडे दारूगोळा नसल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे.
मेजर जनरल अहमद शरीफ म्हणाले की, पाकचे वायूदल नेहमीच सिद्ध असते. ते केवळ मातृभूमीच्या रक्षणासाठी नाही, तर शत्रूचा सूड घेण्यासाठीही सिद्ध असते. जर आमच्यावर कुणी आक्रमण केले, तर आम्ही त्याचा सूड घेऊ.
बाजवा यांनी काश्मीर प्रकरणीही करार केला होता !
हमीद मीर आणि नसीम जहरा यांनी ब्रिटनमधील पाकिस्तानी वृत्तवाहिनी ‘यूके४४’ वरील एका कार्यक्रमात म्हटले होते की, माजी सैन्यदलप्रमुख कमर बाजवा यांनी वर्ष २०२१ मध्ये म्हटले होते, ‘भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी गोपनीय चर्चा केली होती आणि भारताचे पंतप्रधान मोदी यांच्या पाकिस्तानच्या दौर्याचे नियोजन केले होते. तसेच या बैठकीनंतर दोन्ही देशातील सीमेवर गोळीबार बंद करण्यात आला होता.’ बाजवा यांनी काश्मीर प्रकरणीही करार केला होता.
संपादकीय भूमिका
|