२५ मार्चपासून देवरुख ते गोंदवले बसफेरीस प्रारंभ !

संग्रहित चित्र

रत्नागिरी – ‘श्रीराम जय राम जय जय राम’, हा नामजप अनुग्रहित करणारे श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या गोंदवले या गावी जाण्यासाठी देवरुख एस्.टी. आगारातून २५ मार्चपासून बसफेरी चालू करण्यात येणार आहे. यामुळे आता रत्नागिरीवासियांना श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या समाधीच्या दर्शनासाठी जाणे सुलभ होणार आहे.

ही बस देवरुखहून प्रतिदिन दुपारी १२:१५ वाजता सुटणार आहे. ही बस देवरुख, साखरपा, मलकापूर, कोकरूड, शेडगेवाडी, उंडाळे, कराड, पुसेसावळी, वडूज, दहिवडी, गोंदवले मार्गे म्हसवडला जाईल. परतीच्या प्रवासाकरता ती सकाळी १०:३० वाजता म्हसवड येथून सुटणार आहे. या बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन एस्.टी. प्रशासनाने प्रवाशांना केले आहे.

बसचे आगळे-वेगळे वैशिष्ट्य !

देवरुख-गोंदवले-म्हसवड ही बस राज्यातील ७ तालुके, ७ शहरे, ७ नद्या, ७ देवस्थाने आणि ७ पर्यटनस्थळे जोडणारी आहे. हे या बसचे आगळे-वेगळे वैशिष्ट्य आहे.