रावतळे (चिपळूण) येथे हरिद्वार येथील अखिल विश्व गायत्री परिवाराच्या वतीने २४ कुंडी गायत्री महायज्ञ  !

१००८ दिव्यांचा भव्य दीपयज्ञ

चिपळूण, २३ मार्च (वार्ता.) – शांतीकुंज, हरिद्वार येथील अखिल विश्व गायत्री परिवार, गायत्री चेतना केंद्र (मुंबई) आणि गायत्री परिवार (चिपळूण) यांच्या वतीने तालुक्यातील श्री देवी विंध्यवासिनी मंदिर, रावतळे येथे २४ कुंडी गायत्री महायज्ञाचा प्रारंभ २१ मार्च या दिवशी भावपूर्ण वातावरणात झाला. उद्या २४ मार्च या दिवशी या महायज्ञाची पूर्णाहुतीने सांगता होणार आहे.

२१ मार्च या दिवशी मळ्यातील श्री गणपतीपासून श्री देवी विंध्यवासिनी, रावतळेपर्यंत कलशयात्रा आणि शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अनेक जणांनी सहभाग घेतला. सायंकाळी ‘आद्यशक्ती, युगशक्ती गायत्री’, या विषयावर प्रवचन झाले.

२२ मार्चला सकाळी ६.३० वाजल्यापासून ध्यानसाधना, प्रज्ञायोग, देवपूजन, गायत्री महायज्ञ आणि सायंकाळी ‘महिलांनो जागे व्हा, स्वत:ला ओळखा’ विषयावर प्रवचन झाले.

२३ मार्च या दिवशी सकाळी ध्यानसाधना, प्रज्ञायोग, गायत्री महायज्ञ, संस्कार परंपरा आणि सायंकाळी प्रवचन, १००८ दिव्यांचा भव्य दीपयज्ञ असे कार्यक्रम झाले.

२४ मार्च या दिवशी सकाळी ६.३० वाजता ध्यान, प्रज्ञायोग, संस्कार गायत्री महायज्ञाची पूर्णाहुतीने सांगता होणार आहे.