रत्नागिरी पोलीस दलाकडून स्वतंत्र ‘यू ट्यूब चॅनेल’चे उद्घाटन !

रत्नागिरी – रत्नागिरी पोलीस दलाच्या वतीने राबवण्यात येणार्‍या सर्व जनजागृतीपर उपक्रमांची, तसेच सामान्य जनतेपर्यंत अत्यावश्यक संदेश आणि माहिती पोचावी, यासाठी सध्या प्रभावी ठरेल, या उद्देशाने रत्नागिरी पोलीस दलाच्या स्वतंत्र ‘यू ट्यूब चॅनेल’चे उद्घाटन २२ मार्च या दिवशी सायंकाळी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते झाले.

‘सामान्य जनतेपर्यंत अत्यावश्यक संदेश आणि माहिती पोचवण्याकरता पोलीस दलाचे हे स्वतंत्र ‘यू ट्यूब चॅनेल’ प्रभावी ठरेल’, असा विश्वास पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या वेळी व्यक्त केला.

कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार यांच्या हस्ते आणि पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, तसेच पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वीच ‘सायबर क्राइम’, ‘रस्ते अपघात सुरक्षा’, ‘महिला सुरक्षा’ आणि ‘ड्रंक अँड ड्राइव्ह टाळणे’ या जनजागृतीपर ४ चित्रफितींचे लोकार्पण करण्यात आले होते. या चित्रफितीही या वेळी दाखवण्यात आला.