कराड येथील कापड दुकानदारांची १ लाख २५ सहस्र रुपयांची ऑनलाईन फसवणूक !

येथील बाजारपेठेतील कापड दुकानदारांची भाग्यनगर (हैद्राबाद) येथील युवकाने १ लाख २५ सहस्र रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी कराड शहर पोलिसांनी शहेनशहा शरीफ शेख यांना अटक केली असून कापड व्यापारी अभिषेक जैन यांनी पोलिसात तक्रार प्रविष्ट केली होती.

‘पंचमहाभूत बोध’ प्रयोगात मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी घेतली पंचतत्त्वांच्या संरक्षणाची शपथ !

प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या संकल्पनेतून निर्माते दिग्दर्शक विजू माने यांनी सिद्ध केलेल्या या प्रयोगाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. केवळ २० मिनिटांत ५० कलाकारांच्या सहभागातून हा प्रयोग सादर करण्यात आला आहे.

संतांना विरोध करणार्‍या जातीयवाद्यांना थारा देऊ नका ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

केवळ हिंदूंना संघटित होण्याची दिशा दाखवणार्‍यांनाच जाणीवपूर्वक विरोध केला जात आहे. ब्राह्मणद्वेषामुळे बाबासाहेब पुरंदरे यांनाही पुरस्कार देण्यात आल्यानंतर असाच विरोध केला होता. हिंंदु धर्माला विरोध करणे, हाच यांचा एकमेव अजेंडा आहे.

महाशिवरात्रीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने धनबाद येथे ३ दिवसांचा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम आणि सामूहिक नामजप पार पडला !

कार्यक्रमात शिवाचा सामूहिक नामजप करतांना एका महिला जिज्ञासूला ‘सामूहिक नामजप करतांना शिवाच्‍या चरणाशी बसले आहे’, असे तिला जाणवले.

काँग्रेसने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय शिवरात्री महोत्सवात ‘अल्लाह हू’चे गाणे !

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याची काँग्रेसची ही जुनीच खोड आहे.  नुकत्याच झालेल्या हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस विजयी झाल्याने तेथे काँग्रेस सरकारकडून हिंदु धर्मावर असेच आघात होत राहिल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !

भारत-चीन सीमेवर भारताकडून सर्वांत मोठ्या सैन्यबळाची नियुक्ती हे ऐतिहासिक पाऊल !

भारताच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रनिष्ठेला खीळ बसवण्यासाठी पाश्चात्त्य राष्ट्रांनी आतापासूनच कंबर कसायला आरंभ केला आहे’, असे सुतोवाच डॉ. जयशंकर यांनी या वक्तव्याच्या माध्यमातून केले आहे, हे लक्षात घ्या !

भारताला सनातन धर्माचा पाया असल्याने आपण जगात सर्वश्रेष्ठ होऊ ! – एस्.व्ही. शर्मा, शास्त्रज्ञ, इस्रो

जिथे विज्ञान संपते, तिथे अध्यात्म चालू होते. विज्ञानाने कोणताही नवीन शोध लावला नसून आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी जे शोध लावले आहेत, केवळ त्याचे ‘डिकोडींग’ करत आहोत.

केंद्रीय निवडणूक आयोग विसर्जित करण्याच्या उद्धव ठाकरे यांच्या मागणीला माझा पाठिंबा ! – भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

कारण त्यांचा अर्थमंत्रालयातील कार्यकाळ संशयास्पद होता, असे ट्वीट भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केले आहे.

मुलींच्या विवाहाचे वय २१ वर्षे करण्यास सर्वाेच्च न्यायालयाचा नकार

विशेष म्हणजे वर्ष २०२१ मध्ये केंद्राने संसदेत मुलींच्या विवाहाचे किमान वय २१ वर्षे करण्याचे विधेयक सादर केले होते. हे विधेयक संसदेच्या स्थायी समितीकडे पाठवण्यात आले आहे.

भारतीय संस्कृतीमध्ये मनुष्याच्या सर्वांगीण विकासाची चावी ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

भारतातील विद्यार्थ्यांचे आई-वडील त्यांचे दायित्व घेत आहेत. आजी-आजोबा संस्कार करत आहेत आणि परिवार त्यांच्यावर लक्ष ठेवत आहे. यासाठी कृतज्ञ राहिले पाहिजे.