६ गुणांसाठी विचारलेल्या प्रश्नांच्या ठिकाणी उत्तरे प्रसिद्ध केली !

प्रश्नपत्रिका सिद्ध झाल्यानंतर तिची पुनर्पडताळणी केली जात नाही का ? केली जात असेल, तर ती पडताळणार्‍या संबंधितांना ही त्रुटी लक्षात कशी आली नाही ?

खासदार श्रीकांत शिंदे यांनी मला मारण्याची सुपारी गुंडाला दिली !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी मला मारण्याची सुपारी ठाण्ो येथील एका गुंडाला दिली आहे, असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. याविषयीचे पत्र त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई, तसेच ठाणे येथील पोलीस आयुक्तांना दिले आहे.

धुळे येथे शिवजयंती मिरवणुकीवर धर्मांधांकडून दगडफेक !

हिंदूंच्या मिरवणुकीवर दगडफेक व्हायला धुळे जिल्हा काय पाकिस्तानात आहे का ? केवळ हिंदूंनाच सर्वधर्मसमभावाचे धडे देणारे आता कोणत्या बिळात लपून बसले ? पोलीस प्रशासनाने अशा घटना घडूच नयेत, यासाठी प्रयत्न करायला हवेत.

तुर्कीये आणि सीरिया येथे पुन्हा भूकंप : ५ जणांचा मृत्यू

या भूकंपाचे धक्के लेबनॉन, इस्रायल आणि सायप्रस या देशांमध्येही जाणवले. ६ फेब्रुवारीला झालेल्या भूकंपामध्ये मृत झालेल्यांची संख्या ४७ सहस्रांहून अधिक झाली आहे.

संस्कृत राजभाषा घोषित करा ! – माजी सरन्यायाधीश शरद बोबडे

संस्कृत ही ईश्‍वरनिर्मित भाषा असून त्याला ‘देवभाषा’ म्हटले जाते. गेली लक्षावधी वर्षे या भाषेचा उपयोग सनातन हिंदु धर्मीय करत आले आहेत. एक माजी सरन्यायाधीश अशी मागणी करत असतांना केंद्र सरकारने त्याचा गांभीर्याने विचार करावा, असेच संस्कृतप्रेमींना वाटते !

भाग्यनगर येथे भटक्या कुत्र्यांच्या आक्रमणात ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

भटक्या कुत्र्यांची समस्या संपूर्ण देशातील नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. यावर आता केंद्र सरकारने ठोस उपाययोजना काढणे आवश्यक आहे !

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाला ‘सर्वाेत्कृष्ट चित्रपटा’चा पुरस्कार

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

बसवाहकाने एक रुपया परत दिला नाही; म्हणून प्रवाशाला ३ सहस्र रुपये हानीभरपाई !

बेंगळुरू येथे बसवाहकाने प्रवाशाला तिकिटाचा एक रुपया परत न दिल्याने प्रवाशाने ग्राहक न्यायालयाकडे तक्रार केली. याच्या परिणामस्वरूप न्यायालयाने ग्राहकाला ३ सहस्र रुपयांची हानीभरपाई देण्याचा आदेश दिला.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अटींचे पालन करण्यासाठी पाककडून संसदेत विधेयक संमत

दिवाळखोर होण्याच्या उंबरठ्यावर उभ्या असणार्‍या पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अटी मान्य करण्यासाठी संसदेत एक विधेयक संमत केले आहे. नाणेनिधीच्या अटींचे पालन केले, तर पाकला सुमारे ९ सहस्र कोटी रुपयांचे कर्ज मिळणार आहे.