देशातील सर्वाधिक कुष्‍ठरोगी महाराष्‍ट्रात !

कुष्‍ठरोगींना अपंगत्‍वाचे प्रमाणपत्र देणे आणि त्‍यांना नोकर्‍या उपलब्‍ध करून देणे, यांविषयी सर्वंकष धोरण निश्‍चित करण्‍यासाठी संबंधित तज्ञ अन् अधिकारी यांची समिती नेमण्‍यात येईल, अशी घोषणा मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २८ फेब्रुवारी या दिवशी विधानसभेत केली.

देहली येथे आयोजित ‘विश्‍व पुस्‍तक मेळाव्‍या’त सनातन संस्‍थेचे ग्रंथ प्रदर्शन

येथील प्रगती मैदानात २५ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत ‘विश्‍व पुस्‍तक मेळाव्‍या’चे आयोजन करण्‍यात आले आहे. या मेळाव्‍यात सनातन संस्‍थेच्‍या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्‍पादने यांचे प्रदर्शन लावण्‍यात आले आहे. या प्रदर्शन कक्षाचे उद़्‍घाटन सनातन संस्‍थेचे संत पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला कुमार यांनी केले.

जर श्रीलंकेमध्ये हलाल प्रमाणपत्रावर बंदी येऊ शकते, तर भारतात का नाही ? – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

गुजरातमध्‍ये अक्षरधाम मंदिरावर बाँबस्‍फोट करणार्‍या ३० आरोपींना फाशीची शिक्षा झाली. त्‍यांना सोडवण्‍यासाठी ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ ही इस्‍लामी संस्‍था कायदेशीर साहाय्‍य करत आहे. जमियत उलेमा-ए-हिंद जर न्‍यास (ट्रस्‍ट) आहे, तर हलाल प्रमाणपत्राच्‍या माध्‍यमातून मिळवत असलेला लाभ घटनात्‍मक कसा ?

नागालँड आणि त्रिपुरा राज्यांत पुन्हा भाजप अन् मित्रपक्ष सत्तेत येणार !

‘इंडिया टुडे’, ‘टाइम्स नाऊ’ आणि ‘झी न्यूज’ या वृत्तवाहिन्यांनी मतदानोत्तर चाचणी केली होती. या तिन्ही चाचण्यांमध्ये ‘नागालँड आणि त्रिपुरा राज्यांत भाजप अन् त्याचे मित्रपक्ष यांना घवघवीत यश मिळेल’, असे नमूद करण्यात आले आहे.

किनारपट्टीची धूप झाल्यामुळे १० वर्षांत गोव्यातील २८.८ हेक्टर भूमी नष्ट ! – इस्रोचा अहवाल

ही नैसर्गिक प्रक्रिया आहे कि भौतिक लाभासाठी मानवाने केलेल्या नैसर्गिक हानीचा परिणाम आहे, याचा शोध घेऊन योग्य ती उपाययोजना करायला हवी !

गोवा  गुंतवणूक प्रोत्साहन आणि सुविधा मंडळाची ६ प्रकल्पांना अनुमती

गोवा गुंतवणूक प्रोत्साहन आणि सुविधा मंडळाने २८ फेब्रुवारीला झालेल्या बैठकीत गोव्यात  ६ प्रकल्पांना अनुमती दिली. या प्रकल्पाद्वारे राज्यात ३१० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.

श्री अय्यप्पा स्वामींचा अवमान करणार्‍या नास्तिकतावादी नेत्याची जमावाकडून धुलाई !

बैरी नरेश सातत्याने हिंदूंच्या देवतांविषयी आक्षेपार्ह विधाने करत असल्यामुळे त्याच्या विरोधात लोकांमध्ये संतप्त भावना आहेत. त्यामुळे याअधीही त्याला लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे.

डॉक्टर स्पर्श न करता रुग्णांची तपासणी करू शकत नाही ! – केरळ उच्च न्यायालय

काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने त्याच्या पत्नीची वैद्यकीय तपासणी करणार्‍या डॉक्टरला मारहाण केली होती. डॉक्टरने पत्नीशी गैरवर्तन केल्याचा आरोप या व्यक्तीने केला होता. या व्यक्तीला अटकपूर्व जामीन देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला.

उत्तरप्रदेश सरकार ‘रामकथा संग्रहालय’ ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’कडे सोपवणार !

ट्रस्टने हे संग्रहालय कह्यात घेतल्यानंतर ही कागदपत्रे जनतेसाठी खुली करण्यात येतील, तसेच श्रीरामजन्मभूमीच्या ठिकाणी उत्खनन केल्यानंतर सापडलेल्या कलाकृतीही सर्वांना पहाण्यासाठी खुल्या करण्यात येणार आहेत.

मी ख्रिस्ती असलो, तरी माझे हिंदु धर्मावर प्रेम आहे ! – सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती के. एम. जोसेफ

हिंदु धर्म महान असला, तर हिंदूंना त्याचे ज्ञान नाही. त्यांना धर्मशिक्षण दिले जात नसल्याने त्यांना याची माहिती नाही आणि त्यामुळेच हिंदु तरुणी लव्ह जिहादला बळी पडतात, गरीब हिंदू ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या आमिषाला बळी पडून धर्मांतर करतात !