भारत, हिंदु समाज आणि पंतप्रधान यांच्याविषयी द्वेष पसरवणार्या ‘बीबीसी’वर कठोर कारवाई करा !
गुजरातमध्ये वर्ष २००२ मध्ये झालेली दंगल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी ‘बीबीसी न्यूज’ने एका माहितीपटाद्वारे खोटी माहिती प्रसारित केली आहे. वास्तविक सर्वाेच्च न्यायालयाने पंतप्रधान मोदी यांना निर्दाेष म्हणून घोषित केले आहे.